चौथ्या पत्नीला ट्रिपल तलाक, सहावे लग्न करण्याची तयारी; उत्तर प्रदेशच्या माजी मंत्र्याला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:57 PM2021-08-20T12:57:45+5:302021-08-20T13:08:58+5:30

Triple Talaq Case: विवाहांमुळे चर्चेत राहणारे माजी मंत्री बशीर चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. आहे. आग्रा येथील मंटोला पोलीस ठाण्यातील पोलिसांना बशीर चौधरी यांना अटक केली.

विवाहांमुळे चर्चेत राहणारे माजी मंत्री बशीर चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. आहे. आग्रा येथील मंटोला पोलीस ठाण्यातील पोलिसांना बशीर चौधरी यांना अटक केली. बशीर चौधरी यांची चौथी पत्नी नगमा हिने ते सहावे लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र मी नकार दिल्याने त्यांनी मला ट्रिपल तलाक दिला, अशा आरोप केला आहे.

पत्नीने ट्रिपल तलाक दिल्याच्या आरोपाखाली तक्रार दिल्यानंतर बशीर चौधरी यांना अटक करण्यात आळी. त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. यापूर्वी बशीर चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

माजी मंत्री बशीर याची चौथी पत्नी नगमा हिने आरोप केला की, २३ जुलै रोजी तिचे पती शाईस्ता नावाच्या तरुणीसोबत सहावा निकाह करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी सासरी गेले होते. यादरम्यान, बशीरने तीन वेळा तलाक बोलून मला घराबाहेर काढले.

यानंतर नगमा हिने मंटोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अटक करण्यासाठी कारवाई केल्यावर बशीर चौधरी फरार झाले होते. त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळली. त्यानंतर बशीर चौधरी यांना अटक करण्यात आली.

बशीर चौधरी आणि नगमा यांचा विवाह ११ नोव्हेंबर २०११ रोजी झाला होता. ती बशीरची चौथी पत्नी आहे हे नगमाला नंतर समजले होते. तेव्हा नगमाने तिचे शोषण केले जात असल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणी तिने गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर बशीर चौधरी तुरुंगातही गेले होते. मात्र नंतर दोघांमध्ये तडजोड झाली होती.

आता पुन्हा एकदा नगमा हिने बशीरविरोधात तीन तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बशीर चौधरीला अटक झाली आहे. सध्या नगमा तिच्या दोन्ही मुलांसह माहेरी राहत आहे.

२००२ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर बशीर चौधरी यांनी दक्षिण आग्रा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर ते मुलायम सिंह यादव सरकारमध्ये मंत्री बनले होते. पुढे त्यांनी सपा सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. त्यांनी अनेकदा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. हल्लीच त्यांनी आग्राच्या महापौरपदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती.

Read in English