सावत्र भाऊ अनेक महिने अल्पवयीन बहिणीवर करत होता बलात्कार, मोबाईलमुळे फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:26 PM2022-02-20T17:26:07+5:302022-02-20T17:31:54+5:30

Rape Case : भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून समोर आली आहे.

येथे पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपी हा पीडितेचा सावत्र भाऊ आहे.

या प्रकरणाबाबत ऐशबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हणाले की, अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात आली आणि तिने तिच्याच सावत्र भावाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी हा तिच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले, दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे.

तक्रारीनुसार, पहिल्या पत्नीचा मुलगा आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलीमध्ये नेहमीप्रमाणे बोलणे होत असे, मात्र सुमारे 6-7 महिन्यांपूर्वी त्याने तिला एकटे असल्याचे पाहून बलात्कार केल्याची घटना घडली. यानंतरही अनेकवेळा आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आणि यादरम्यान तिचा व्हिडिओही बनवला.

नुकतेच आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर तिचे अश्लील फोटो पाठवले असता अल्पवयीन मुलीच्या आईने ते पाहिले. यानंतर कुटुंबीयांनी मुलीकडे विचारपूस केली असता तिने आपबिती सांगितली.

सत्य समजल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला ऐशबाग पोलिस ठाण्यात नेले, जेथे पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 376 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलीस खांडवा येथे छापे टाकत आहेत.

भोपाळमध्ये सावत्र भाऊ अनेक महिन्यांपासून बहिणीवर बलात्कार करत होता. मुलीच्या आईने तिच्या सावत्र भावाने पाठवलेले अश्लील छायाचित्र तिच्या फोनवर पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.