तरुणीनं दाखल केली सामूहिक बलात्काराची तक्रार; तपासातून समोर आला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 02:21 PM2021-02-15T14:21:29+5:302021-02-15T14:25:17+5:30

माझं अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची तक्रार एका १९ वर्षीय मुलीनं पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यामधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.

तेलंगणातल्या घाटकेसरमध्ये घडलेल्या घटनेमुळे पोलीस दल चक्रावून गेलं आहे. तरुणीनं अपहरण आणि सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस तपासातून वेगळीच माहिती पुढे आली.

रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीनं सांगितल्याप्रमाणे कोणताही प्रकार घडला नाही. संबंधित तरुणीनं संपूर्ण कथा रचून पोलिसांची दिशाभूल केली.

सखोल तपास आणि तांत्रिक पुराव्यांमुळे तरुणीनं कथन केलेला प्रकार घडल्याचं नसल्याचं पोलिसांना समजलं. काही कौटुंबिक कारणांमुळे तरुणीला घर सोडून जायचं होतं, अशी माहिती तपासातून पुढे आली.

तरुणीला घर सोडून जायचं होतं. मात्र तरुणी बेपत्ती झाल्यानं या सगळ्यात पोलिसांची एंट्री झाली. त्यामुळे अस्वस्था झाल्यानं तरुणीनं एक वेगळीच कथा रचली आणि ती पोलिसांना सांगितली.

एका महाविद्यालयीन तरुणीचं अहरण झाल्याची तक्रार किसारा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुढील दोन तासांत पोलिसांनी संबंधित तरुणीला शोधलं. ती एका निर्जन स्थळी पोलिसांना सापडली.

माझं अपहरण झालं असून चार रिक्षा चालकांनी माझ्यावर बलात्कार केल्याचं तरुणीनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी १० पथकं तयार केली.

पोलीस तपासातून मात्र वेगळीच बाब समोर आली. संबंधित तरुणीचं रिक्षा चालकाशी भांडण झालं असल्यानं त्याचा बदला घेण्यासाठी तिनं या सगळ्यात त्याचं नाव गोवण्याचा प्रयत्न केल्याचं आयुक्त भागवत यांनी सांगितलं.

तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दाखल केली होती. रिक्षा चालकानं आर. एल. नगरला रिक्षा थांबवलीच नाही आणि आपलं अपहरण केल्याचं संबंधित तरुणीनं घरी फोन करून सांगितलं. यानंतर तिचा फोन नॉट रिचेबल झाला.

पोलिसांनी तरुणीचं मोबाईल लोकेशन आणि त्या भागातील सीसीटीव्ही तपासले. रिक्षा चालकांच्या युनियनची मदत घेतली. त्यानंतर मुलगी पोलिसांना सापडली. मात्र तिचे दावे आणि पुरावे जुळत नव्हते. त्यानंतर तरुणीनं हा सगळा बनाव असल्याची कबुली पोलिसांना दिली.

टॅग्स :अपहरणKidnapping