Nude Photo Shoot : रणवीर सिंगविरुद्ध एफआयआर, चार कलमांअन्वये गुन्हा दाखल; जाऊ लागू शकतं तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 02:27 PM2022-07-26T14:27:34+5:302022-07-26T14:40:44+5:30

Ranveer Singh Nude Photoshoot: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचा वाद वाढत चालला आहे.

मुंबईतील चेंबूरमध्ये रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२ आणि आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घ्या, या कलमांतर्गत दोषी आढळल्यास रणवीर सिंगला काय शिक्षा होऊ शकते.

न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे.

रणवीरवर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 293, 509 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 (A) अंतर्गत रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणवीरवर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अंतर्गत त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्याच्याविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम ६७(ए) अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो अजामीनपात्र आहे.

वकिलाने सांगितले की, आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत 5 वर्षे आणि कलम 293 अंतर्गत 3 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याच वेळी, आयटी कायदा 67A अंतर्गत, 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले. या बोल्ड फोटोशूटची छायाचित्रे पोस्ट होताच रणवीर सिंग सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांनी रणवीरचे कौतुक केले, तर द्वेष करणाऱ्यांनी अभिनेत्याला त्याच्या बोल्ड निवडीबद्दल ट्रोल केले. रणवीरच्या न्यूड फोटोंवर अनेक मीम्स बनवण्यात आले. आतापर्यंत सर्व काही ठीक होते, मात्र आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे, त्यामुळे आता हे प्रकरण गंभीर बनले आहे.