सूर्याचे गोचर: ६ राशींना कर्क संक्रांती शुभ, ६ राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 03:03 PM2023-07-18T15:03:03+5:302023-07-18T15:03:03+5:30

सूर्य कर्क संक्रांतीत कोणत्या राशींवर सूर्यकृपा होऊ शकेल? कोणत्या राशींना हा काळ संमिश्र ठरू शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य दरमहा राशीपरिवर्तन करत असतो. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. सूर्य ज्या राशीत असतो, त्या राशीची ती संक्रांती ओळखली जाते. आताच्या घडीला अधिक मास सुरू आहे. वास्तविक पाहता अधिक मासात सूर्य राशीपरिवर्तन करत नाही. मात्र, अधिक मासाच्या पूर्वसंध्येला सूर्याने राशीसंक्रमण केले असून, पुढील महिनाभर सूर्य एकाच राशीत असेल.

सूर्याने मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. १७ ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत असणार आहे. सूर्य संक्रमणाचा हा काळ कर्क संक्रांती म्हणूनही ओळखला जातो. सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश अतिशय विशेष मानला गेला आहे. सूर्याच्या कर्क संक्रांतीचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. मात्र, काही राशींना हे गोचर शुभ-लाभदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशानंतर बुधाशी युती होऊन अतिशय शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. विशेष म्हणजे शनी-सूर्याचा प्रतिकूल मानला गेलेला षडाष्टक योगही जुळून येत आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? कोणत्या राशीच्या व्यक्तींना सूर्यकृपेचा लाभ मिळू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश शुभ परिणामकारक ठरू शकेल. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. सन्मान मिळेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रगती अपेक्षेप्रमाणे होईल. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना उच्च पद मिळण्याची संधी मिळेल. विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होतील. चांगले परिणाम मिळवतील.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामे काळजीपूर्वक करावीत. विनाकारण खर्चांत वाढ होऊ शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर उत्तम संधी मिळू शकतात. निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करा. अन्यथा नुकसान होऊ शकते. वैयक्तिक जीवनातही काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. बोलण्यात कठोरता राहील. कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडू शकतात.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश शुभ प्रभाव वाढणारा ठरू शकेल. सरकारी क्षेत्रात लाभाची शक्यता निर्माण होत आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ झाल्याची बातमी येऊ शकते. अडकलेले पैसे मिळू शकतील. फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत कोणत्याही मुद्द्यावरून तणाव होऊ शकतो. वादविवाद होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

कर्क राशीत सूर्याने प्रवेश केला आहे. या राशीच्या व्यक्तींना कर्क संक्रांतीचा काळ अनुकूल ठरू शकेल. जीवनाच्या विविध पैलूंमध्ये अनुकूल परिणाम आणि सुधारणा दिसून येतील. शुभ फले मिळतील. आरोग्याच्या समस्या दूर होतील. वैवाहिक समस्या लवकर सुटतील. सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना आशादायक संधी मिळतील. वैवाहिक जीवनात वाद कमी होतील.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश इच्छापूर्तीचा ठरू शकेल. अनेक अपूर्ण स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. व्यवसायात नफा वाढेल. मात्र, खर्चातही लक्षणीय वाढ होईल. सन्मान किंवा पुरस्कारही मिळू शकतात. कुटुंबासोबत कुठेतरी प्रवासाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेशाने चांगले परिणाम मिळू शकतील. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यापारी वर्गासाठी आर्थिक लाभ निर्माण होत असून, नवी उंची गाठू शकाल. नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल. नवीन मित्रही बनतील. खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रगतीची शक्यता आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश अनुकूल ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने विशेष फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल. सध्या पगारवाढीसारखे सकारात्मक परिणाम मिळतील. आगामी काळ अत्यंत लाभदायक ठरेल. आत्मविश्वास वाढेल. जीवनात सकारात्मक बदल घडतील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. वडिलांसोबतचे संबंध बिघडू शकतात. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नोकरीमध्ये खूप अस्थिर असू शकते. नोकरी बदलण्याची ही योग्य वेळ नाही. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकेल. जोडीदारासोबत काही जुन्या प्रकरणावरून वाद होऊ शकतात.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश संमिश्र ठरू शकेल. खर्च वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे धावपळ करावी लागू शकते. काही कारणाने प्रतिमा मलिन होऊ शकते. काही लोक जुन्या मुद्द्यांवरून भांडू शकतात. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर राहा. कामाचा ताण वाढू शकतो.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश संमिश्र ठरू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांचे भागीदाराशी भांडण होऊ शकते. नुकसान होऊ शकते. व्यवसायातील तुमची ऑर्डर रद्द केल्यामुळे नुकसान वाढू शकते. उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात काही बदल होऊ शकतात. वादविवादापासून दूर राहा. करिअरच्या दृष्टीने कोणतेही नवीन प्रयोग करणे टाळाणे हिताचे ठरू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. वैयक्तिक आयुष्यात खूप तणाव असू शकतो. विरोधक मोठे षडयंत्र रचू शकतात. अनावश्यक खर्च वाढतील. बॉससोबत तुमचे संबंध फारसे चांगले जमेल असे नाही. वागण्यात थोडा कोरडेपणा असू शकतो. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कर्क प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. समस्या वाढू शकतात. नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतील. आर्थिक स्थितीवर शुभ परिणाम होईल. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. परीक्षेत चांगले गुण मिळतील. कठोर परिश्रम केल्याने परिणाम तुमच्या बाजूने येतील. फायदा होईल.