३० वर्षांनी शनीचा उदय: ‘या’ १० राशींसाठी अनुकूल, धनवृद्धी योग; शुभ-लाभ अन् दिलासादायक काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 06:06 AM2023-03-06T06:06:06+5:302023-03-06T06:06:06+5:30

शनी उदय अतिशय महत्त्वाचा मानला जात असून, तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या, डिटेल्स...

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीत अस्तंगत असलेला शनी ०६ मार्च रोजी उदय झाला आहे. सुमारे ३० वर्षांनी शनी कुंभ राशीत विराजमान असून, याच राशीत उदय झाला आहे. शनी फेब्रुवारी महिन्यात अस्तंगत झाला होता. यानंतर ३१ दिवसांच्या कालावधीनंतर मार्च महिन्यात शनीचा उदय झाला आहे. (saturn rising in aquarius 2023)

एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते. आताच्या घडीला सूर्य आणि शनी कुंभ राशीत आहेत. (shani uday in kumbh rashi 2023)

शनी सूर्यापासून लांबच्या अंशांवर गेल्यामुळे पुन्हा दिसू लागेल. शनी उदय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. कारण अस्तंगत असताना शनीचा प्रभाव अत्यल्प असतो, असे मानले जाते. यातच १५ मार्च रोजी शनी शततारका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीचा उदय आणि शततारका नक्षत्रातील प्रवेश कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय काहीसा संमिश्र ठरू शकेल. करिअर आणि व्यावसायिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक चांगला कालावधी आहे. काही वेळेस परिस्थिती आव्हानात्मक असू शकते. नातेसंबंधात काही तणाव जाणवू शकतो. कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याची गरज आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय संमिश्र ठरू शकेल. वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करावे. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा चांगला काळ आहे. अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतो. एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते, ज्याचा दीर्घकाळ फायदा होऊ शकतो. जोडीदाराशी किंवा प्रियजनांसोबत काही तणाव किंवा संघर्षाचा अनुभव येऊ शकतो. कोणताही गैरसमज किंवा भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी खुलेपणाने, प्रामाणिकपणे संवाद साधणे आवश्यक आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय अनुकूल ठरू शकेल. या काळात नवीन लोकांना भेटाल. मित्र आणि कुटुंबियांशी नाते मजबूत करू शकाल. भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकता. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकेल. एखाद्या प्रोजेक्टमध्ये काही विलंब किंवा अडथळे येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय सकारात्मक ठरू शकेल. क्षमता वाढेल. सर्व कामे हळूहळू पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक जीवनात काही संधी मिळू शकतील. मेहनतीचे चीज होऊ शकेल. मात्र, मिळालेल्या यशाने हरखून जाऊ नये. प्रिय व्यक्तींशी शेअर करायचे असल्यास हा कालावधी अनुकून ठरू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय चांगला ठरू शकेल. अनपेक्षित नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू नये. भविष्यात स्थैर्य येण्यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. वडिलांशी सुरू असलेला वाद मिटू शकेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

कन्या राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय अनुकूल ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. व्यावसायिक जीवनात काही अनपेक्षित बदल किंवा संधीही येऊ शकतात. काही खास लोक भेटू शकतात, जे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडतील. बजेटची काळजी घ्या. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदार, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. त्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी आणि अनपेक्षित आव्हानांना तोंड देण्यासाठी हा चांगला काळ असेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय काहीसा दिलासादायक ठरू शकेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतील. विवाहासाठी नवीन स्थळे येऊ शकतील. करिअरमध्ये धावपळ करावी लागू शकेल. पण प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक आघाडीवर मोठा परिणाम होईलच असे नाही. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत काही आव्हाने येऊ शकतात.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय सकारात्मक ठरू शकेल. आशावादी दृष्टिकोन बाळगणे हिताचे ठरू शकेल. नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल. कठोर परिश्रमाने नवी ओखळ निर्माण करू शकता. नवीन संधी निर्माण होतील. गुंतवणूक आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी बचत करण्यासाठी हा चांगला काळ आहे. अविवाहित लोकांना नेहमीपेक्षा थोडा जास्त ताण जाणवू शकतो.

धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय अनुकूल ठरेल. नोकरदार लोक त्यांच्या कामाने बॉसला प्रभावित करतील. पगारवाढीवर बोलणी करू शकतात. इतर रोजगार शोधू शकता. मूल्ये शेअर करणारी एखादी नवीन व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. खूप कठोर परिश्रम करणे टाळावे. आवश्यक असेल तेव्हा विश्रांती घ्यावी. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय सकारात्मक ठरू शकेल. करिअर वाढ आणि विस्तारासाठी नवीन संधी मिळू शकतील. भावांसोबत काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम केल्याने पदोन्नतीची संधी मिळू शकेल. पगारात वाढ होऊ शकते. कोणतीही महत्त्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी खात्री करा. अन्यथा नुकसान होऊ शकते. भावनिक बंध मजबूत करण्यासाठी हा एक चांगला कालावधी आहे.

कुंभ राशीत सूर्य आणि शनी विराजमान आहे. याच राशीत होत असलेला शनीचा उदय या राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. वैयक्तिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी नवीन संधी उघडतील. बचतीमध्ये चांगली वाढ होऊ शकेल. काही वेळ एकांत घालवण्याची गरज असू शकते. ध्यानधारणा, योगासने किंवा इतर आध्यात्मिक पद्धतींकडे आकर्षित होऊ शकता. प्रेम जीवनात काही समस्या असू शकतात, परंतु आपण संवादाद्वारे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल.

मीन राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय अनुकूल ठरू शकेल. विशेष लोकांशी संवाद वाढेल. नवीन संपर्क साधण्याच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक संकटातून सुटका करून भावंडांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. एखादा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. परंतु निर्णय घेण्यापूर्वी ते पूर्णपणे तपासा. विवाहितांसाठी हा काळ अनुकूल राहील. कामाच्या गर्दीत आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.