२ ग्रह मार्गी: ‘या’ ८ राशी होणार मालामाल; दिवाळीत धनलाभ, सुख-समृद्धी, भाग्योदयाचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:48 AM2022-10-04T11:48:33+5:302022-10-04T11:58:15+5:30

विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह स्वराशीत मार्गी होत असल्याचा शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. कोणत्या लकी राशींना उत्तम लाभ मिळू शकतील? जाणून घ्या...

ज्योतिषीय दृष्टिने ऑक्टोबर महिना उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात नवग्रहांपैकी दोन महत्त्वाचे ग्रह मार्गी होत आहे. या दोन ग्रहांचे मार्गी होणे शुभ मानले जात आहे. याचा सकारात्मक प्रभाव दिसू शकेल, असे सांगितले जात आहे.

ऑक्टोबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात चातुर्मासातील अत्याधिक महत्त्व असलेल्या दसरा, दिवाळीसह अन्य सण-उत्सव, व्रत-वैकल्ये असणार आहेत. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ०२ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत मार्गी झालाय.

तर, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी २६ ऑक्टोबर रोजी आपलेच स्वामीत्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणार आहे. यापूर्वी विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह स्वराशीत मार्गी होत आहेत.

बुध आणि शनी ग्रह आपलेच स्वामित्व असलेल्या कन्या आणि मकर राशीत मार्गी होत असल्याचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या आहेत, त्या राशी? दिवाळीत शुभ-लाभ मिळू शकतील. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होण्याचा शुभ ठरू शकेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगली ऑर्डर मिळू शकते, या व्यतिरिक्त तुम्ही नोकरी केली तर तुमच्यासाठी नोकरीच्या खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील.

वृषभ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होणे लाभदायक ठरू शकते. विशेष करून शनी मार्गी झाल्यानंतर या राशींना खूप फायदा होईल. मान-सन्मान तर मिळेल. समाजात विशेष व्यक्ती म्हणून ओळख निर्माण होऊ शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होणे आनंददायी ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. तुम्हाला तुमच्या आईकडून सर्वतोपरी मदत मिळेल. व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील. तुमची विश्वासार्हता वाढेल. तुम्हाला काही नवीन ऑर्डर मिळू शकतात.

कर्क राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. तुमचे चांगले दिवस सुरू होतील. भावंडांसोबतचे संबंधही सुधारतील. प्रवास कोणताही असो, पण पूर्ण यश मिळेल. तुमचे संवाद कौशल्यही सुधारेल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. हा काळ करिअरच्या दृष्टीने चांगला सिद्ध होऊ शकतो आणि तुम्हाला काही कामाची माहिती मिळू शकते.

कन्या राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होणे उत्तम ठरू शकेल. तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या स्वभावाचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. करिअर आणि शिक्षणातही यश मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. पैशाच्या बाबतीत तुम्हाला अचानक लाभ होण्याची अपेक्षा आहे. कुठेतरी अडकलेला पैसा हातात येऊ शकतो.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होणे फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित यश मिळेल. तुमची कमाई वाढेल आणि समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. येणी किंवा अडकलेले पैसे मिळू शकतील.

धनु राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होणे सकारात्मक ठरू शकेल. या राशीच्या लोकांनाही फायदा होईल. दिवाळीच्या आसपास संपत्तीचे अनेक स्त्रोत मिळतील. उत्पन्नातही वाढ होऊ शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बुध आणि शनी मार्गी होणे विशेष ठरू शकेल. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. सणासुदीच्या काळात जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकेल. करिअरबद्दल बोलायचे झाले तर, यश आणि प्रगतीची कवाडे खुली करणारी मोठी संधी मिळू शकेल. त्याचबरोबर लेखन आणि साहित्याशी निगडीत असलेल्यांनाही यावेळी अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. कारकीर्दही योग्य मार्गावर जाऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.