Numerology: शुभच होईल! ‘या’ ५ मूलांकांना भरभराटीचा काळ, धनलाभाची होळी; अपार यश-प्रगतीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:33 PM2023-03-06T13:33:33+5:302023-03-06T13:40:30+5:30

Numerology: होळीचा कालावधी आणि ग्रहांच्या स्थितीत होत असलेला बदल काही मूलांकांसाठी फायदेशीर मानला जात आहे. जाणून घ्या...

Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार या आठवडाभरात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत. मराठी वर्षातील शेवटचा पण महत्त्वाचा मानला गेलेला होळीचा सण आहे. या दिवशी अनेकविध उत्तम योग जुळून येत आहे. याशिवाय नवग्रहांचा न्यायाधीश कुंभ राशीत उदय होत आहे. मंगळाचे राशीपरिवर्तन होत आहे. शनी शततारका नक्षत्रात प्रवेश करत आहे. (Holi 2023)

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाच्या माध्यमातून भविष्यकथन केले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत त्या व्यक्तीच्या मूलांकावरून अंदाज बांधता येऊ शकतात. नवग्रहांना जसे राशींचे स्वामित्व देण्यात आले आहे, तसेच नवग्रहांना मूलांकांचेही स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे. शनी आणि मंगळ अनुक्रमे ८ आणि ९ मूलांकांचे स्वामी आहेत.

होळीचा कालावधी आणि ग्रहांच्या स्थितीत होत असलेला बदल तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या मूलाकांना यश-प्रगतीच्या संधी मिळतील? कोणत्या मूलांकांसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? या काळात काय करू नये? ते जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. या मूलाकांना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. जुन्या गोष्टी अचानक समोर येऊ शकतात. व्यावसायिकांसाठी आगामी काळ चांगला राहील. काही चांगल्या बातम्या मिळतील. जुन्या समस्येपासून मुक्ती मिळू शकेल. त्याचबरोबर मन शांत आणि आनंदी राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. या मूलाकांना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. काम पूर्ण होऊ शकतील. नफा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न अधिक तीव्र करावे, यश मिळेल. कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळावे, अन्यथा कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या विचलित होऊ शकाल. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. या मूलाकांसाठी आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कुटुंबात आर्थिक चढ-उतार येऊ शकतील. पैशाशी संबंधित काही योजना शेवटच्या क्षणी अडकू शकतात. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने हे काम पूर्ण होऊ शकेल. व्यापारी वर्गासाठी महत्त्वाचा काळ ठरू शकेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. या मूलाकांना आगामी काळ चांगला ठरू शकेल. अचानक एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी अनेक संधी खुल्या होतील. विद्यार्थ्यांसाठी आगामी काळ विशेष फलदायी ठरू शकतो. परीक्षेचा निकाल मन उत्साहीत करू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना आगामी काळ समस्याकारक ठरू शकेल. आर्थिक बाबींवर लक्ष द्यावे. स्वतः आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल, परंतु दुसऱ्याच्या मताने प्रभावित होऊन घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. वैयक्तिक अहंकारामुळे जुन्या नात्यात वाद होऊ शकतात, ते टाळा. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. या मूलाकांना आगामी काळ मध्यम फलदायी राहील. कामांमध्ये चढ-उतार दिसून येऊ शकेल. व्यापार्‍यांना आकस्मिक व्यवहारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. असाच काहीसा योग राजकारणाशी निगडित लोकांसोबत घडताना दिसू शकेल. अचानक मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. या मूलाकांसाठी आगामी काळ मानसिक अस्थिरतेने भरलेला ठरू शकेल. हळूहळू मानसिक शांती लाभू शकेल. कौटुंबिक वाद घरातील वातावरण बिघडू शकतात. त्यामुळे या काळात वादांपासून दूर राहा. आरोग्याशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. या मूलाकांच्या व्यक्तींनी आगामी काळात मन आणि वाणी दोन्हींवर नियंत्रण ठेवावे. अन्यथा याचा नात्यांवर परिणाम होऊ शकतो. बहुतांश काळ अनुकूल राहू शकेल. नोकरदारांच्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. पदोन्नतीची शक्यता निर्माण होत आहे. सुखी वैवाहिक जीवन प्राप्त होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना नशिबाची साथ लाभू शकेल. महत्त्वाची कामे पूर्ण करा. कला आणि रंगभूमीशी संबंधित लोकांसाठी शुभ आणि फलदायी काळ राहू शकेल. नवीन कामांना सुरुवात होऊ शकेल. घरात काही शुभ कार्य सुरू होण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.