५०० वर्षांनी ५ राजयोगांचा अद्भूत संयोग: ५ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; मिळेल पैसा अपार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:58 PM2023-12-21T13:58:21+5:302023-12-21T14:08:32+5:30

५ शुभ राजयोगांचा ५ राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

डिसेंबर २०२३ मध्ये ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग जुळून येत आहेत. यापैकी काही योग हे राजयोगाप्रमाणे अत्यंत शुभ फळ देणारे आहेत. काही दाव्यांनुसार ५०० वर्षांनी ४ राजयोगांचा अद्भूत संयोग डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पाहायला मिळणार आहे. हे ५ राजयोग ५ राशींसाठी सर्वोत्तम लाभदायक असल्याचे म्हटले जात आहे.

नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत आहे. तर नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह मेष राशीत आहे. सूर्य आणि गुरु एकमेकांपासून नवमपंचम स्थानी आहेत. त्यामुळे राजलक्षण नामक राजयोग जुळून येत आहे. तसेच ३१ डिसेंबर रोजी गुरु मेष राशीत मार्गी होत आहे.

गुरु मेष राशीत मार्गी झाल्यानंतर कुलदीपक नावाचा राजयोग जुळून येत आहे. तर शुक्र स्वराशीत असल्यामुळे मालव्य राजयोग जुळून येत आहे. डिसेंबर महिन्याची सांगता होत असताना शुक्र राशीपरिवर्तन करणार आहे. तर नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे.

मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य आणि मंगळ या दोन ग्रहांचा आदित्य मंगल नामक शुभ राजयोग जुळून येत आहे. याशिवाय नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध धनु राशीत वक्री आहे. त्यामुळे सूर्य आणि बुधाचा अतिशय शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून आला आहे.

डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात ५ राजयोग जुळून येत असून, सन २०२३ ची सांगता होताना आणि नववर्ष २०२४ च्या सुरुवातीला ५ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम आणि शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतात. कोणत्या आहेत त्या ५ भाग्यवान राशी? जाणून घेऊया...

मेष: या राशीच्या लोकांना राजयोगांचा फायदा होऊ शकतो. संपत्तीत वाढ होऊ शकते. आत्मविश्वास वाढू शकतो. करिअरमध्ये प्रगती साध्य होऊ शकते. पैसा आणि सन्मान मिळेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. जे परदेशात नोकरीसाठी जाण्यास इच्छुक आहेत त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.

मिथुन: या राशीच्या व्यक्तींना गुरु ग्रुहाचा कुलदीपक राजयोग अधिक फायदेशीर ठरू शकतो. शुभ परिणाम मिळू शकतील. अशा स्थितीत प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करू शकता. योग्य माहिती घेऊन संशोधन केल्यास लाभ होऊ शकतो. नोकरदारांना बॉसचे पूर्ण सहकार्य मिळू शकते.

सिंह: या राशीच्या व्यक्तींना राजयोग खूप फायदेशीर ठरू शकता. आदर आणि सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात पत वाढण्याची शक्यता आहे. येत्या नवीन वर्षात प्रमोशन मिळू शकते. वेळ अनुकूल आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यापार आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.

तूळ: या राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळतील. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विवाहासाठी चांगली स्थळे येऊ शकतात. करिअरमध्ये फायदे होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

कुंभ: या राशीच्या व्यक्तींना कुलदीपक राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जातो. वैवाहिक जीवन मधुर होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.