ही आहे शाहरुख खानची पहिली Electric SUV, रेंज तब्बल 631km; किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:05 PM2024-01-18T22:05:41+5:302024-01-18T22:09:49+5:30

Shah Rukh Khan First Electric Car: शाहरुख खानकडे अनेक आलिशान गाड्या आहेत, पण ही EV सर्वात खास आहे.

Shah Rukh Khan First Electric Car- Hyundai Ioniq 5: बॉलिवूड 'किंग' म्हणजेच शाहरुख खानकडे आलिशान आयुष्य जगतो. त्याच्याकडे एकापेक्षा एक जबरदस्त कार आहेत. यातील बहुतांश कार्ससोबत तुम्ही त्याला पाहिलेही असेल. पण, शाहरुख खानच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

शाहरुख खानची पहिली आणि एकमेव इलेक्ट्रिक कार Hyundai Ioniq 5 आहे. शाहरुख खान भारतात ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ह्युंदाईशी तो बऱ्याच काळापासून जोडला गेला आहे. म्हणूनच, गेल्या वर्षाच्या अखेरीस ह्युंदाईनेच शाहरुख खानला धन्यवाद भेट म्हणून IONIQ 5 दिली होती.

Hyundai Motor India Limited चे MD आणि CEO युन्सू किम तेव्हा म्हणाले होते की, “Hyundai गेल्या 25 वर्षांपासून शाहरुख खानशी जोडलेली आहे. शाहरुख खान ह्युंदाई कुटुंबातील पहिल्या सदस्यांपैकी एक आहे. आमचा ब्रँड वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आम्ही शाहरुख खानला धन्यवाद भेट म्हणून IONIQ 5 देत आहोत."

Hyundai IONIQ 5 E-GMP प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात 72.6 kWh बॅटरी पॅक आहे, जो 350 kW DC चार्जरने फक्त 18 मिनिटांत 10-80% चार्ज केला जाऊ शकतो. IONIQ 5 ची रेंज(मायलेज) 631 किमी आहे. ही कंपनीची भारतातील सर्वात महागडी कार आहे.

या कारची किंमत 45.95 लाख रुपये (एक्स-शोरूम, पॅन-इंडिया) आहे. Hyundai ने Ioniq 5 ला गेल्या वर्षी जानेवारीत ऑटो एक्सपो दरम्यान लॉन्च केले होते. यानंतर वर्षभरात 1000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली. Hyundai ने शाहरुख खानला दिलेली Ioniq 5 हे मॉडेलचे 1100 वे युनिट होते.