उन्हात तापलेली कार आतून लगेचच कशी थंड कराल? एसी वाढवण्याची चूक सारेच करतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 04:58 PM2023-04-25T16:58:16+5:302023-04-25T17:10:56+5:30

कारमध्ये गेल्या गेल्या कोणत्यातरी उष्ण चेंबरमध्ये गेल्यासारखे वाटत आहे. ही कार लवकर थंड कशी करता येईल... काही कार हॅक्स... तुम्ही नक्की फॉलो करा...

उकाड्याने सगळेच हैराण झाले आहेत. सकाळी साडे सात- आठचे उनही अंगावर घ्यावेसे वाटत नाहीय एवढे चटके बसत आहेत. मग गाडीची काय अवस्था असेल. स्कूटर असली तर सीट, हँडल आणि ब्रेक भाजून काढत आहेत. तर कारमध्ये गेल्या गेल्या कोणत्यातरी उष्ण चेंबरमध्ये गेल्यासारखे वाटत आहे. कामानिमित्त बाहेर गेला आणि कार उन्हात ठेवली तर पुन्हा कारमध्ये बसायची हिंमत होत नाहीय.

अशावेळी कार थंड कशी ठेवता येईल, कारमधील आतील भाग लवकर थंड कसा करता येईल. प्रत्येकजण अनेक प्रकारे उपाय करतो, परंतू काही उपाय हे चुकीचे आहेत, हे अनेकांना माहिती नसते. चला जाणून घेऊयात भर उन्हात तापलेली कार आतून कशी थंड करायची...

सर्वात आधी तुमची कार जुनी तर असेलच. मग एअर फिल्टर स्वच्छ करा. जमल्यास नवा बसवा. धुळ जमा झाल्याने तो योग्यरित्या काम करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एसीचा गॅस रिकामा झालाय की लो लेव्हलला आहे ते तपासा.

उन्हात गाडी पार्क करावी लागली असेल तर पार्क करताना खिडकीच्या काचा एक बोट खाली करून ठेवा. यामुळे आतील गरम हवा वर येऊन ती बाहेर निघून जाईल आणि आतील तापमान वाढणार नाही.

गाडीतील हवा तापलेली असेल तर सुरु करताना एसी फुल स्पीडमध्ये सुरु करू नका. यामुळे एसी योग्यरित्या काम करत नाही. ही चूक बहुतांश लोक करतात. असे केल्याने एसी काही काळ गाडीतील आतील हवाच खेचून घेत असतो. यामुळे बाहेरील त्यापेक्षा थंड हवा आत येत नाही व थंड होण्यास वेळ लागतो.

गाडीचा दरवाजा उघडलात की खिडक्या उघडा आणि दरवाजांची उघडझाप करा. यामुळे आतील हवा दबावामुळे बाहेर पडेल.

सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा एसी सुरु कराल तेव्हा काचा खाली करा आणि एसीचा पायातील ब्लोअर चालू करा. यामुळे गरम हवा वर जाईल आणि खिडकीतून बाहेर जाईल व त्याची जागा थंड हवा घेईल. या टिप्स नक्की फॉलो करा...

कृपया गाडी घरी असो की बाहेर उन्हात असताना अनलॉक करून ठेवू नका. कारण लहान मुले आतमध्ये जाऊन त्यांचा गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता असते. यामुळे नेहमी कारचे दरवाजे लॉक झालेत का याची खात्री करा व नंतरच तुमच्या कामाला निघा.