Hero Xtreme 160R Stealth एडिशन 2.0 लाँच, पाहा काय आहे खास आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 01:46 PM2022-09-29T13:46:15+5:302022-09-29T13:49:36+5:30

हीरोची नवी 2022 Hero Xtreme 160R Stealth एडिशन नुकतीच लाँच करण्यात आली. पाहूया यात कोणते जबरदस्त फीचर्स देण्यात आलेत.

Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0 launched: Hero MotoCorp या भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने Xtreme 160R या बाइकचं अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. बोल्ड रेड एक्सेंटसह नव्या पेंट स्कीम आणि हीरोच्या कनेक्टेड टेक्नॉलॉजीसह ही बाईक येते.

डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Xtreme 160R Stealth Edition 2.0 बाईक तिच्या स्डँडर्ड व्हेरिअंटप्रमाणेच आहे. परंतु ती टेलिस्कोपिक फोर्क, फ्रेम आणि पिलियन ग्रॅब रेलवर स्ट्रायकिंग रेड एक्सडेंटसोबत मॅट ब्लॅक कलर शेडमध्ये सादर करण्यात आली आहे. या बाईकमध्ये knuckle गार्डही देण्यात आलेय.

नवीन 2022 Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0 ची भारतात किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यामध्ये बोल्ड रेड एक्सेंटसह नवीन पेंट स्कीम आणि मोटरसायकलसाठी हीरो कनेक्टेड टेक्नॉलॉजी वापरण्यात आलीये.

या बाईकमध्ये 163cc सिंगल सिलिंडर एअर कुल्ड, फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,500 RPM वर 15 bhp आणि 6500 RPM वर 14 Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर स्टील्थ एडिशन 2.0 मध्ये ब्लूटुथ कनेक्टिव्हीटीही देण्यात आलीये. यात हीरो कनेक्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून ब्लूटुथ कनेक्टिव्हीटीसह इनव्हर्टेड डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरही मिळतं.

हीरो एक्स्ट्रीम 160 आर स्टेल्थ व्हर्जनला ग्राहकांकडून आणि तज्ज्ञांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. ज्यांना युनिक स्टाईलची आवड आहे, त्यांना ही बाईक आवडेल. नवीन एडिशन स्टील्थ आणि स्मार्ट दोन्ही आहे. टेक्नॉलॉजी प्रेमी लोकांसाठी क्लाऊड कनेक्ट 1.0 देण्यात आलंय, अशी प्रतिक्रिया लाँचदरम्यान हीरो मोटोकॉर्पचे स्ट्रॅटजी आणि ग्लोबल प्रोडक्ट प्लानिंग हेड Malo Le Masson यांनी दिली.