OLA च्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काऊंट; फक्त ९९९ रुपयांत करा बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 02:33 PM2022-10-23T14:33:11+5:302022-10-23T14:35:39+5:30

ओला इलेक्ट्रिकने (OLA Electric) सणासुदीच्या काळात आणखी एक स्कूटर बाजारात आणली आहे. कंपनीने नवीन स्कूटरचे नाव Ola S1 Air असं ठेवलं आहे. त्याची किंमत Ola S1 पेक्षा कमी आहे. हे Ola S1 च्या बेसवरच ही तयार करण्यात आली आहे.

कंपनीचे प्रमुख भावीश अग्रवाल यांनी या S1 Air बद्दल सांगितले की, ही स्कूटर फक्त २५ पैसे खर्च करून एक किलोमीटरचे अंतर कापेल. ओलाची नवीन स्कूटर S1 Air ची किंमत ८४,९९९ रुपये आहे. पण कंपनी त्यावर फेस्टिव डिस्काऊंट देत आहे.

तुम्ही २४ ऑक्टोबरपर्यंत Ola S1 Air बुक केल्यास, तुम्हाला ते रुपये ७९,९९९ मध्ये ती मिळेल. दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही एस1 एअर बुक केले तर तुमचे सुमारे पाच हजार रुपये वाचतील. अशी ऑफर कंपनीने ग्राहकांसाठी ठेवली आहे.

ओलाची नवीन स्कूटर S1 Air ९९९ रुपये टोकन रक्कम भरून बुक करता येईल. कंपनीचा दावा आहे की Ola S1 Air एका चार्जवर इको मोडमध्ये १०१ किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते.

ओलाच्या नवीन स्कूटरमध्ये ३४ लीटर अंडर-सीट स्टोरेज मिळेल. तसेच तुम्ही तुमच्या मूडनुसार तुमच्या स्कूटरची स्क्रीन, आवाज बदलू शकता. त्याच वेळी, यात 10W चा स्पीकर देखील आहे, जो तुम्हाला कुठेही पार्टी करण्यासाठी वापरता येऊ शकतो.

याशिवाय S1 एअरमध्ये फ्लॅट फूटबोर्ड, स्कल्प्टेड सीट्स, ट्विन रिअर सस्पेन्शन आणि फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शनही देण्यात आले आहेत. Ola S1 Air पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४.५ तास लागतील. या स्कूटरमध्ये तीन राइड मोड देण्यात आले आहेत.

यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स आहेत. कंपनीने या स्कूटरचे ५ रंग बाजारात आणले आहेत. त्यात निओ मिंट, जेट ब्लॅक, कोरल ग्लॅम, पोर्सिलेन व्हाइट आणि लिक्विड सिल्व्हर आहेत.

Ola S1 Air ची खरेदी विंडो फेब्रुवारी २०२३ मध्ये उघडेल. त्याच वेळी, त्याची डिलिव्हरी एप्रिल २०२३ मध्ये सुरू होईल. या स्कूटरचे वजन फक्त ९९ किलो आहे. कंपनीने यामध्ये 4.5kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. यात 2.5kWh बॅटरी पॅक आहे.

कंपनीचा दावा आहे की Ola S1 Air एका चार्जवर इको मोडमध्ये १०१ किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. त्याचा टॉप स्पीड देखील ९० किमी प्रतितास आहे. त्याच वेळी, ते फक्त ४.३ सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेग पकडते.