ट्रॅक्टर पुलाला धडकल्याने चालकाने उडी घेतली, मात्र ट्रॉलीखाली चिरडून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 07:34 PM2024-03-12T19:34:57+5:302024-03-12T19:35:10+5:30

पाथरी तालुक्यातील रेणापूर शिवारातील घटना

When the tractor hit the bridge, the driver jumped, but was crushed to death under the trolley | ट्रॅक्टर पुलाला धडकल्याने चालकाने उडी घेतली, मात्र ट्रॉलीखाली चिरडून झाला मृत्यू

ट्रॅक्टर पुलाला धडकल्याने चालकाने उडी घेतली, मात्र ट्रॉलीखाली चिरडून झाला मृत्यू

पाथरी : राज्य महामार्ग 61 वर पाथरी तालुक्यातील रेणापूर शिवारामध्ये पूलाला धडक बसल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने बाहेर उडी घेतली. पण त्याच्याच ट्रॉलीखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. राजू पांडुरंग राठोड (35,  रा . कोकाटे हदगाव ता. परतुर जि .जालना) असे मृत चालकाचे नाव आहे. 

राजू पांडुरंग राठोड हा चालक आज दुपारी उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली (क्र .एम एच 45 एफ 5255 ) घेऊन राज्य महामार्ग 61 वरून जात होता. दुपारी 12 .30 वाजेच्या सुमारास रेणापुर शिवारामध्ये नदीवरील पुलास ट्रॅक्टर धडकले. आले असता ट्रॅक्टर पुलाच्या कठड्याला धडकले . यावेळी जीव वाचण्याच्या प्रयत्नात चालक राठोड याने बाहेर उडी घेतली. पण त्याच्याच ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून राठोडचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. 

माहिती मिळताच पाथरी पोलिसांना अपघातस्थळी भेट दिली. पोना . गजानन पिंपळपल्ले यांनी पंचनामा केला. दरम्यान, याच ठिकाणी अनेक वेळा अपघात घडत असल्याने संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: When the tractor hit the bridge, the driver jumped, but was crushed to death under the trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.