परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:35 AM2018-05-12T00:35:27+5:302018-05-12T00:35:27+5:30

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.

Parbhani: Trouble with drivers by wrong direction | परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

Next

मानवत (परभणी): शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.
मानवत शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो़ या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे़ याचे काम एल अ‍ॅड टी कंपनी करीत असून, पाथरी ते मानवत रोड नवीन वळण रस्त्यापर्यंतचे काम अंतीम टप्प्यात आहे़ त्याच मार्गावर बसस्थानक असून, सध्या एल अँड टी कंपनीच्या वतीने ठिक ठिकाणी दिशादर्शक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ परंतु, दिशादर्शक फलक बसविताना पुरेशी माहिती नसल्याने चुकीच्या दिशेने फलक बसविण्यात आला आहे बसस्थानक परिसरात माजलगाव नाव असलेला दिशादर्शक फलक बसविण्यात आला आहे़ मात्र या फलकाची दिशा चुकली असून, पाळोदी रस्त्याकडे दिशा दाखविण्यात आली आहे़ त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गोची होत आहे़ नवीन वाहन चालक या फलकामुळे आपले वाहन माजलगावकडे नेण्याऐवजी पाळोदी गावामध्ये पोहचत आहे़ १५ किमीचा फटका सहन करीत पुन्हा मानवतला येऊन माजलगावकडे मार्गक्रमण करावे लागत आहे़ चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत असून, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ चुकीच्या दिशेने लावलेला फलक योग्य दिशेला बसवावे, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Trouble with drivers by wrong direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.