परभणीत साडे सात लाखाची चोरी; कुलुपबंद घरात खिडकीचे गज वाकवत केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 02:29 PM2017-11-24T14:29:11+5:302017-11-24T14:32:23+5:30

शहरातील जुना पेडगावरोड परिसरातील वैभवनगर भागात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यानी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करीत कपाटातील १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

Parbhani stole seven and a half lakhs of rupees; In the locked house, the window gauge has been tilted | परभणीत साडे सात लाखाची चोरी; कुलुपबंद घरात खिडकीचे गज वाकवत केला प्रवेश

परभणीत साडे सात लाखाची चोरी; कुलुपबंद घरात खिडकीचे गज वाकवत केला प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देपामे कुटुंबीय नातेवाईकाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते.सकाळी ६ वाजेच्या सुमारास पामे कुटुंबीय घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

परभणी : शहरातील जुना पेडगावरोड परिसरातील वैभवनगर भागात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यानी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करीत कपाटातील १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

परभणी शहरातील वैभवनगर भागात रमेश दत्तात्रय पामे यांचे घर आहे. गुरुवारी रमेश पामे यांचा मुलगा योगेश पामे याचा शहरातील काही व्यक्तींसोबत वाद झाला होता. त्यामुळे पामे कुटुंबीय नातेवाईकाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री पामे यांच्या घराच्या संरक्षण भिंतीवरुन परिसरात प्रवेश केला व घराच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून खिडकीची एक बाजू काढली. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करुन बेडरुममधील कपाटातील रोख अडीच लाख रुपये व १५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. 

आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास पामे कुटुंबीय घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नानलपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून जिंतूररोडपर्यंतचा माग काढला. तेथून पुढे श्वान घुटमळले. या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

शेजा-याच्या घराला लावल्या कड्या
अज्ञात चोरट्यांनी पामे यांचे घर फोडण्यापूर्वी त्यांच्या शेजारी असलेले संजय सुरवसे यांच्या घराच्या दरवाजांना बाहेरुन कड्या लावल्या. त्यानंतर पामे यांच्या घरात जावून चोरी केली. सकाळी सुरवसे कुटुंबीय दरवाजा उघडत असताना बाहेरुन कडी असल्याने तो उघडला गेला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यानी येऊन त्यांच्या घराची कडी उघडली. 

Web Title: Parbhani stole seven and a half lakhs of rupees; In the locked house, the window gauge has been tilted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी