परभणी : क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची प्रवास बिले रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:45 AM2018-12-25T00:45:50+5:302018-12-25T00:46:08+5:30

येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़

Parbhani: Regional workers' travel bills were canceled | परभणी : क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची प्रवास बिले रखडली

परभणी : क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची प्रवास बिले रखडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़
कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात क्षेत्रीय कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांचा उहापोह करण्यात आला आहे़ विभागीय बैठकीमध्ये अनेक वेळा माहिती देऊनसुद्धा मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत़ तेव्हा प्रवास देयकांबरोबरच शाखाधिकारी, उपविभागीय अभियंता यांनी मंजूर केल्या प्रमाणे प्रवासभत्ते जशाच्या तसे मंजूर करावेत, पुढील प्रवास देयके दर तीन महिन्यांच्या आत अदा करावीत, सिंचन व्यवस्थापनातील दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, मजूर, कालवा चौकीदार ही पदे तात्काळ भरावीत, कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीमुळे तसेच जलसंधारण खात्यामध्ये कर्मचाºयांचा समावेश झाल्याने अनेक पदे रिक्त आहेत़
तेव्हा कार्यरत कर्मचाºयांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून, कर्मचाºयांवरील भार कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे़
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील काकडे, अनिल रसाळ, पल्लवी कोल्हे, सुनील लोंढे, रामेश्वर मोरे, रमेश गजलवाड, गजानन चिबडे, वैशाली वडकुते, शीला गायकवाड आदींची उपस्थिती होती़
सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी
४सिंचन कर्मचाºयांनी याच संदर्भात महिला क्षेत्रीय कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला आहे़ या कर्मचाºयांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़
४त्यावर उपाययोजना कराव्यात, अतिरिक्त क्षेत्र सांभाळणाºया प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाºयास त्याच्या मागणीप्रमाणे रोजंदारी मजूर लावण्यास मंजुरी द्यावी तसेच क्षेत्रीय कर्मचाºयांच्या परवानगीशिवाय मजुरांची मजुरी अदा करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे़ या मागण्या वारंवार केल्या जात आहेत. मात्र, त्या सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Web Title: Parbhani: Regional workers' travel bills were canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.