परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:55 PM2019-01-30T23:55:46+5:302019-01-30T23:56:09+5:30

यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.

Parbhani: Out of 15 villages, 24 acquisitions of acquisition | परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढली नाही. परिणामी पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत असल्याने ग्रामपंचायतीना अडचणी निर्माण होत आहेत. कसुरा व करपरा नदी काठावरील गावांना नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही गावातील जलकुंभ कोरडे पडल्याने ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील लाडनांद्रा, गव्हा, ढेंगळी पिंपळगाव, पार्डी कौसडी, तांदुळवाडी, शिंदे टाकळी, चिकलठाणा बु., गुळखंड, खादगाव, कन्हेरवाडी, कान्हड, जवळा जिवाजी, कुंडी, वाकी, झोडगाव या १५ ग्रामपंचायतींनी गावातील पाणी उपलब्ध असलेले २२ जलस्रोत अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत. यामधील १७ प्रस्ताव मंजूरीसाठी तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. पं.स.कडून अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयात आल्यानंतर मंडळ अधिकाºयांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करून मंजूरी दिली जाते. ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याने अनेक दिवस अधिग्रहणाचे प्रस्ताव संबंधित विभागात मंजुरीअभावी पडून आहेत.
कसुरा, करपरा : नदीकाठ तहानलेलाच
४ कसुरा, करपरा नदीवर मोठा बंधारा नाही. त्यामुळे पाणी अडविण्याचे साधन नाही. पावसाचे पाणी नदीपात्रातून सरळ वाहून जात आहे.
४परिणामी दोन्ही नदी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाºया विहीरी कोरड्या पडत असल्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Parbhani: Out of 15 villages, 24 acquisitions of acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.