परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:16 AM2018-08-30T00:16:19+5:302018-08-30T00:17:12+5:30

जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला़

Parbhani meeting: Purchase closure of the hill till the center starts | परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद

परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला़
२०१८-१९ च्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस आदी शेतमालाची शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाने खरेदी न केल्यास व्यापाऱ्यांना ५० हजार रुपयांचा दंड व एक वर्षाचा कारावास ठोठावण्यात येईल, असा आदेश देण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर बाजार समिती व व्यापाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे़
शासनाने आदेश देऊनही व्यापाºयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांचा माल खरेदी करणे सुरू होते़ या प्रकरणी तालुक्यातील सोन्ना व इतर गावांतील शेतकºयांनी बाजार समिती प्रशासनाकडे लेखी तक्रार करून आमचा माल कमी दराने खरेदी केला जात असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या लक्षात आणून दिले़ या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात व्यापारी, आडते, खरेदीदार व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक बोलावण्यात आली होती़ या बैठकीत सहाय्यक निबंधक पी़एस़ राठोड यांनी राज्य शासनाच्या परिपत्रकाचे वाचन केले़ त्यानंतर या बैठकीत हमीभाव दरावर धान्य खरेदी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली; परंतु, व्यापारी असोसिएशनच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला़
त्यानंतर व्यापाºयांकडून जोपर्यंत परभणी जिल्ह्यात शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येत नाही, तोपर्यंत बाजार समितीतील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला़
या बैठकीस बाजार समितीचे सचिव विलास मस्के, शेतकरी प्रतिनिधी किशोर ढगे, अनंत कदम, रामभाऊ आवरगंड, व्यापाºयांच्या वतीने मोतीलाल जैन, संदीप भंडारी, रमेश देशमुख, गोविंदप्रसाद आजमेरा, गोविंदराज मणियार, गोविंद कदम, रमेश जाधव आदींसह ४५ व्यापाºयांची उपस्थिती होती़
शेतकरी सापडले अडचणीत
आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक सण-उत्सव असतात़ या काळात शेतकºयांना पैशाची निकड असते़ त्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेल्या मूग, उडीद, सोयाबीन या पिकांतून मिळालेल्या पैशातून शेतकरी सण उत्सव साजरे करतात; परंतु, शासनाने दिलेल्या निर्णयाचे व्यापाºयांकडून पालन केले जात नाही़ तर शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी करण्यात येत नाहीत़ त्यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल कोठे विक्री करावा? या चिंतेत सध्या शेतकरी दिसून येत आहेत़ त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी नाफेडकडून जिल्ह्यात तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

Web Title: Parbhani meeting: Purchase closure of the hill till the center starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.