परभणी : वाळू वाहतुकीचे चार ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:41 AM2018-12-01T00:41:01+5:302018-12-01T00:41:45+5:30

गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास खाजगी वाहनातून गोदावरी नदीपात्र गाठत जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंगाखेड-धारखेड रस्त्याजवळील नदीपात्रातून वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर पकडून पोलीस ठाण्यात जमा केले आहेत.

Parbhani: Four tractors of sand traffic were caught | परभणी : वाळू वाहतुकीचे चार ट्रॅक्टर पकडले

परभणी : वाळू वाहतुकीचे चार ट्रॅक्टर पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास खाजगी वाहनातून गोदावरी नदीपात्र गाठत जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंगाखेड-धारखेड रस्त्याजवळील नदीपात्रातून वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर पकडून पोलीस ठाण्यात जमा केले आहेत.
गंगाखेड परिसरातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातील वाळू धक्क्याचा लिलाव झाला नसताना शहराजवळील गोदावरी नदीपात्रासह तालुक्यातील गोदाकाठच्या गावातून रात्रं-दिवस अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा केला जात आहे.
यावर निर्बंध लावण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी कधी बियाणांचा प्रचार करणाºया वाहनातून तर कधी रुग्णवाहिकेतून तालुक्यातील गोदापात्र गाठत अवैध वाळू उत्खनन करणारी वाहने पकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला.
२९ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास मुुळी, धारखेड मार्गे खाजगी वाहनातून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी गंगाखेड शहराजवळून वाहणाºया गोदावरी नदीपात्रात येऊन धारखेड-गंगाखेड रस्त्याजवळच्या गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणारे स्वराज ७४४ कंपनीचे दोन, सोनालिका डी ७४५ एक व महिंद्रा ३७५ डीआय १ असे चार ट्रॅक्टर पकडून तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी विक्रम गायकवाड, बालाजी लटपटे, तलाठी गजानन फड, संतोष इप्पर, दत्ताराव बिलापटे, दिलीप कासले, सुरेश भालेराव यांच्या मार्फत पोलिसांच्या ताब्यात दिले.
खाजगी वाहनातून जिल्हाधिकारी गोदावरी नदीपात्रात येऊन चार ट्रॅक्टर पकडल्याची माहिती समजताच वाळूमाफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. रेल्वे पुलाजवळ विनापरवाना वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टर चालकांनी गोदावरी नदीपात्रातून धूम ठोकल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर शहरात होत होती.

Web Title: Parbhani: Four tractors of sand traffic were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.