परभणी : निम्न दुधना प्रकल्पावर २१७४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:55 PM2019-07-07T23:55:27+5:302019-07-07T23:56:05+5:30

सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तीन तालुके आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वाकडे गेले असून, मार्च २०१९ पर्यंत या प्रकल्पावर २१७४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़

Parbhani: Expenditure of Rs. 2174 crores on the following milk production project | परभणी : निम्न दुधना प्रकल्पावर २१७४ कोटींचा खर्च

परभणी : निम्न दुधना प्रकल्पावर २१७४ कोटींचा खर्च

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तीन तालुके आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वाकडे गेले असून, मार्च २०१९ पर्यंत या प्रकल्पावर २१७४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ वितरिका आणि त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादनाचे काम शिल्लक असून, हे काम २०१९-२० या वर्षांत प्रस्तावित करण्यात आले आहे़
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असलेल्या निम्न दुधना प्रकल्पास १९७८-७९ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती़ सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथे दुधना नदीवर हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला़ ४३८़८० मीटर लांबीची दगडी भिंत, ६५८१़२० मीटर लांबीचे माती धरण असलेल्या या धरणाला एकूण २० दरवाजे आहेत़
या धरणामुळे २२ गावे पूर्णत: बाधित झाली असून, पाच गावे अंशत: बाधित झाली आहेत़ या गावांचे पुनर्वसनही झाले आहे़ बाधीत झालेल्या गावांमध्ये परभणी जिल्ह्यातील १ आणि जालना जिल्ह्यातील २१ गावांचा समावेश आहे़ या धरणाच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर १९९४ मध्ये सुरुवात झाली़ २०१३-१४ च्या पावसाळ्यात धरणात प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आला़ ३४४़८० दलघमीची क्षमता असलेले हे धरण असून, चार वर्षापूर्वी या धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला होता़ या धरणाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली आली आहे़ एकूण धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यावरून ५३ हजार ३५९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे़
या प्रकल्पाचा डावा कालवा ६९ किमी लांबीचा असून, या कालव्याची सिंचन क्षमता २८ हजार १८६ हेक्टर एवढी आहे़ तर उजवा कालवा ४८ किमी लांबीचा असून, १६ हजार २९६ हेक्टर सिंचन क्षमता आहे़ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून ८ हजार ८९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते़ सद्यस्थितीला उजव्या कालव्याचे काम ४५ किमीपर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे़ तर डाव्या कालव्याचे काम ६९ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे़
सद्यस्थितीला या प्रकल्पाच्या मुख्य धरणाच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे़ उजव्या आणि डाव्या कालव्याचे भूसंपादनही पूर्ण झाले आहे़ या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात १९ ते ३६ किमी दरम्यान रेल्वे क्रॉसिंग येत आहे़ त्यासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू असून, या विभागाकडे ४ कोटी ५४ लाख रुपये अग्रीम रक्कमही जमा करण्यात आली आहे़ रेल्वे क्रॉसिंग बॉक्सचे कुशिंगचे काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित भिंत व इतर कामासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे़ तसेच कालवा व वितरण व्यवस्थेला छेदणाºया विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम शिल्लक आहे़ ही कामे पूर्ण झाल्यासच वितरिकेची कामे केली जाणार आहेत़ एकंदर २३४१ कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पावर आतापर्यंत २१७४ कोटी ३४ लाख रुपये खर्च झाले असून, काही कामे वगळता धरणाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे़
प्रकल्प पूर्ण होण्यास लागली चाळीस वर्षे
च्ब्रह्मवाकडी येथे उभारण्यात आलेल्या निम्न दुधना प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यता २८ कोटी ४२ लाख रुपये एवढी आहे़ १९७८-७९ या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती़ मात्र मध्यंतरीच्या १६ वर्षामध्ये प्रकल्पाच्या कामाविषयी कोणतीच पावले उचलली गेली नाहीत़
च्त्यामुळे १९९५-९६ मध्ये प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि प्रकल्पाचा खर्च ४७४ कोटी ६ लाखांवर पोहचला़ या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ३ सुधारित प्रशासकीय मान्यता द्याव्या लागल्या आहेत़ २००६-०७ मध्ये दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली़
१६७ कोटींची आवश्यकता
च्या प्रकल्पाची काही कामे अजूनही पूर्ण होणे बाकी आहे़ मार्च २०२० पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे़
च्त्यासाठी १६७ कोटी ३३ लाख रुपयांची आवश्यकता आहे़ या रकमेत भूसंपादनासाठी ६ कोटी ४३ लाख, मुख्य कालव्यासाठी ३५ कोटी ५६ लाख, वितरण व्यवस्थेसाठी ५१ कोटी ९६ लाख, लाभक्षेत्राच्या विकासासाठी १२८ कोटी १० लाख आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी ७ कोटी ३८ लाख रुपयांची आवश्यकता आहे़
च्ही सर्व कामे मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे़
५२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली
निम्न दुधना प्रकल्पाच्या माध्यमातून परभणी आणि जालना जिल्ह्यातील ५१ हजार ८४७ हेक्टर जमीन सद्यस्थितीला सिंचनाखाली आली आहे़ उजव्या व डाव्या कालव्याची सिंचन क्षमता ४४ हजार ४८२ हेक्टर एवढी असून, मार्च २०१९ अखेर या कालव्याच्या माध्यमातून ४२ हजार ९५० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे़ तर उपसा सिंचन योजनेंतर्गत ८ हजार ८९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे़ अजून १ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रापर्यंत सिंचन पोहोचविण्याचे उद्दिष्ट शिल्लक आहे़ या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील मंठा, परतूर, सेलू, मानवत, जिंतूर आणि परभणी तालुक्यातील गावे सिंचनाखाली येत आहेत़

Web Title: Parbhani: Expenditure of Rs. 2174 crores on the following milk production project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.