परभणी : स्वच्छता अभियान संपताच घनकचरा प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:34 AM2018-09-11T00:34:48+5:302018-09-11T00:35:29+5:30

केंद्र शसनाने गतवर्षी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत परभणी महानगरपालिकेने देशपातळीवर जलद प्रतिसादाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असले तरी हे अभियान संपताच मनपाने सुरु केलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Parbhani: End of cleanliness campaign, closure of solid waste | परभणी : स्वच्छता अभियान संपताच घनकचरा प्रकल्प बंद

परभणी : स्वच्छता अभियान संपताच घनकचरा प्रकल्प बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शसनाने गतवर्षी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत परभणी महानगरपालिकेने देशपातळीवर जलद प्रतिसादाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असले तरी हे अभियान संपताच मनपाने सुरु केलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून देशभर शहरी भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ शहर अभियान स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील अनेक शहरांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये परभणी महानगरपालिकेने सहभाग नोंदविला. शहर स्वच्छतेमध्ये परभणी मनपाला पारितोषिक मिळाले नसले तरी नागरिकांना जलद प्रतिसाद व त्यांच्या समस्येचे निराकारण या प्रकारामध्ये मनपाला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याचा भव्य पुरस्कार वितरण समारंभही राज्याबाहेर झाला होता. या पुरस्कारानंतर शहरातील स्वच्छता अभियानाला आता आवकळा आल्याचे सातत्याने दिसून येत आहे. स्वच्छता अभियानाच्या कालावधीत शहरातील कचरा टाकण्याची जागा असलेल्या शहरातील धाररोडवरील डंपिंग ग्राऊंड परिसरात घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प मनपाने सुरु केला होता. येथे घनकचºयापासून खत निर्मितीही करण्यात आली. मनपातील आकडेवारीनुसार जवळपास १७ क्विंटल खताची निर्मिती करण्यात आली. त्या माध्यमातून मनपाला जवळपास साडे आठ लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाल्याचेही सांगण्यात आले. जशी स्पर्धा संपली, तसा हा प्रकल्पही बंद पडला. त्यात तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्याने या प्रकल्पाकडे कोणीही पाहिले नाही. परिणामी आता शहरामध्ये दररोज निर्माण होणारा जवळपास ८० मे. टन कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये पडत आहे. परिणामी या परिसरात दररोज कचºयाचे ढिग वाढत चालले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात परभणीतही औरंगाबादप्रमाणे कचºयाची समस्या निर्माण होऊ शकते.
कचºयाचे विलगीकरणही थांबले
मनपाच्या वतीने पूर्वी ओला आणि सुका असे कचºयाचे वर्गीकरण केले जात होते़ मुळात घंटागाड्यांमध्येच या पद्धतीने कचरा घेतला जात होता़ तो कचरा डम्पींग ग्राऊंडवर त्याच पद्धतीने टाकला जात होता; परंतु, आता स्वच्छता अभियान संपल्यानंतर कचºयाचे विलगीकरणही थांबविण्यात आले आहे़ परिणामी ओला आणि सुका दोन्ही कचरा एकत्रित संकलित केला जात आहे़
धार रोडच्या डम्पिंग ग्राऊंडला विरोध
सद्यस्थितीत परभणी शहरातील कचरा धार रोडवरील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो; परंतु, या परिसरातील नागरिकांचा येथे कचरा टाकण्यास विरोध आहे़ शिवाय काही नगरसेवकांनीही येथे कचरा टाकण्यास विरोध केला होता़ त्यामुळे हा कचरा बोरंवड शिवारातील मनपाच्या जागेत टाकण्याचा निर्णय झाला होता़
निविदा बारगळल्या
धाररोड भागात घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास ५ कोटी रुपयांची निविदा ५ मार्च रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीकोनातून तातडीने कारवाई होईल, अशी शहरवासियांची अपेक्षा होती; परंतु, प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.
उलट ही प्रक्रिया सद्यस्थितीत ठप्प झाली आहे. मनपाच्या वतीने गंगाखेड रोडवरील बोरवंड परिसरात २.४८ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली असून या भागात भविष्यकाळात घनकचरा प्रकल्प उभारण्याचे मनपाचे नियोजन आहे.
यासाठी जवळपास १९ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु, याबाबतही कोणतीही प्रक्रिया मनपाकडून पुढे सरकली नाही. परिणामी शहराच्या घनकचºयाचा प्रश्न कायम आहे.

Web Title: Parbhani: End of cleanliness campaign, closure of solid waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.