परभणी : पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरण कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:07 AM2019-07-03T00:07:42+5:302019-07-03T00:07:42+5:30

विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी पाऊस येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात होत नसल्याने पूर्णा नदीवर असलेल्या येलदरीसह खडकपूर्णा धरणात थोडाही पाणीसाठा जमा झाला नसून परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़

Parbhani: Due to lack of rainfall in the catchment area, dam can dry only | परभणी : पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरण कोरडेच

परभणी : पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धरण कोरडेच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी पाऊस येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात होत नसल्याने पूर्णा नदीवर असलेल्या येलदरीसह खडकपूर्णा धरणात थोडाही पाणीसाठा जमा झाला नसून परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़
औरंगाबाद जिल्ह्यातून उगम पावलेली पूर्णा नदी विदर्भातून परभणी जिल्ह्यात प्रवेश करते़ या नदीवर विदर्भात खडकपूर्णा येथे आणि परभणी जिल्ह्यात येलदरी (ता़ जिंतूर) येथे धरण बांधले आहे़ पूर्णा नदीवर खडकपूर्णा धरणाची निर्मिती झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे़ मागील अनेक वर्षापासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ यावर्षी येलदरी प्रकल्पात केवळ ९९ दलघमी मृतसाठ्यात पाणीसाठा आहे़
सध्या मराठवाड्यात पाऊस होत नसला तरी विदर्भामध्ये मात्र मुसळधार पाऊस होत आहे़ त्यामुळे विदर्भातील पावसाच्या पाण्याने येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र तीही धुळीस मिळाली आहे़ येलदरी धरणाचे पाणलोट क्षेत्र कन्नड, जाफ्राबाद, सिल्लोड, भोकरदन, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, देऊळगाव मही, तळणी, लोणार या भागात आहे़ मागील एक महिन्यापासून विदर्भामध्ये होत असलेला पाऊस हा काटेपूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असून, त्याचा लाभ कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरणाला होत आहे़
त्यामुळे येलदरी प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र विदर्भात असतानाही या प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही़
२५ दलघमीची आवश्यकता
४येलदरी धरणाची साठवण क्षमता ९३४ दलघमी असून, ८१० दलघमी उपयुक्त पाणीसाठवण क्षमता आहे़ धरणाच्या मृतसाठ्यात १२५ दलघमी पाणीसाठा होता़ प्रत्यक्षात ९९ दलघमी पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे़
४हे धरण मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी २५ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे़ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किमान १ हजार ते १२०० मिमी पाऊस झाला तर हे धरण भरू शकते़ सद्यस्थितीला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ ९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
खडकपूर्णाही मृतसाठ्यातच
येलदरी धरणाच्या वरील बाजुस बांधलेल्या खडकपूर्णा धरणाची पाणीसाठवण क्षमता १५९ दलघमी एवढी असनू, हे धरण अजूनही मृतसाठ्यात आहे़ खडकपूर्णा धरण भरल्यानंतरच येलदरी प्रकल्पात पाणीसाठा होणार आहे़ हे धरण बांधल्यापासून म्हणजे २००९ पासून येलदरी धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, या धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे़

Web Title: Parbhani: Due to lack of rainfall in the catchment area, dam can dry only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.