परभणी : प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:37 AM2018-11-24T00:37:24+5:302018-11-24T00:39:26+5:30

तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

Parbhani: Due to administrative delay, due to shortage, | परभणी : प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडाच

परभणी : प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या मुळी बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणीही बंधाºयात थांबले नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुळी बंधारा कोरडा राहिल्याने पाण्याबरोबर शेतकºयांचे स्वप्नही वाहून गेल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
गंगाखेड तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा, सिंचनाबरोबरच गोदावरी नदीकाठावरील काही गावे व गंगाखेड शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघावा, या उद्देशाने तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रात २०११ साली राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून मुळी बंधारा उभारला. ११.३५ दलघमी या बंधाºयाची पाणीसाठवण क्षमता आहे. २०११ साली प्रथमच या बंधाºयात ५.७२ दलघमी पाण्याची साठवण करण्यात आली. त्यानंतर २०१२ साली बंधाºयात पाणी साठविण्यासाठी बंधाºयाचे २० स्वयंचलित दरवाजे बंद करून पाण्याची साठवण करण्यात आली. प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलेल्या या बंधाºयाच्या २० स्वयंचलित दरवाजांपैकी १६ दरवाजे पाण्याच्या दाबामुळे क्षमतीग्रस्त झाले. त्यामुळे बंधाºयात साठविलेले पाणी नदीपात्रात वाहून गेले. त्यानंतर २०१३-१४ मध्ये थोप दरवाजाद्वारे बंधाºयात थोड्याफार पाण्याची साठवण करण्यात आली. २०१५ साली पाऊस झाला नसल्याने बंधारा कोरडाच राहिला. २०१६ साली चांगला पाऊस झाल्याने क्षतीग्रस्त झालेल्या स्वयंचलित दरवाजाची दुरुस्ती करून १८ सप्टेंबर २०१६ रोजी बंधाºयात पाणीसाठवण करण्यात आले. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे बंधाºयातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
२४ सप्टेंबर २०१६ रोजी हे दरवाजे पाण्याच्या दाबामुळे निखळून पडले. त्यामुळे बंधारा पुन्हा रिकामा झाला. मुळी बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठवण करण्यासाठी बंधाºयाला बसविलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी व्हर्टिकल दरवाजे बसवावेत, अशी मागणी गोदावरी संघर्ष समिती, शेतकरी संघटना त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांंनी रास्ता रोको, उपोषण आदी प्रकारचे आंदोलन केले. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आजपर्यंत बंधारा आहे तसाच आहे. परिणामीया बंधाºयात पाणी साठविण्यात आलेच नाही.
कोट्यावधी रुपये खर्च करून गोदावरी नदीवर बांधलेल्या मुळी बंधाºयाचा फायदा या भागातील नागरिकांना काही झालाच नाही. बंधाºयावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च मुळी बंधाºयातील पाण्याबरोबरच वाहून गेल्याचे बंधाºयाच्या सद्य स्थितीवरून दिसून येत आहे.
शासनाचा प्रयोग: तालुकावासियांच्या मुळावर
नदीपात्रात बांधल्या जाणाºया बंधाºयावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेत राज्य शासनाने प्रथमच गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयाला प्रयोगिक तत्वावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला. मुळी बंधाºयावर हा प्रयोग केला मात्र २०१२ व २०१६ साली दोन वेळा बंधाºयाचे दरवाजे निखळून पडल्याने राज्य शासनाचा हा प्रयोग सपसेल अपयशी ठरला. त्यामुळे हा प्रयोग गंगाखेड तालुकावासियांच्या मुळावर आल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे. मुळी बंधारा बांधल्यानंतर पहिल्या पावसाच्या पाण्यासोबत बंधाºयाचे दरवाजे पाण्याच्या प्रवाहाने निखळून पडले. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या सिंचनाचे स्वप्नही वाहून गेले आहे.
बंधाºयाला व्होर्टिकल दरवाजे बसवा
४मुळी बंधाºयावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या ठिकाणी व्होर्टिकल दरवाजे बसवून तालुक्यातील आठ गावांतील १ हजार ४७५ हेक्टर व सोनपेठ तालुक्यातील तीन गावातील २३० हेक्टर असा एकूण १ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीवरील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
४या मागणीसाठी शेतकºयांनी अनेक वेळा आंंदोलने केली आहेत. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने राज्यातील सर्वात मोठे गोदावरी नदीपात्र कोरडेठाक पडण्याची वेळ आली आली आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.

Web Title: Parbhani: Due to administrative delay, due to shortage,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.