परभणी : ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:40 AM2018-10-02T00:40:48+5:302018-10-02T00:41:20+5:30

ईव्हीएमचा मशीनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी वसमत रस्त्यावर ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.

Parbhani: Combustion of EVM replication | परभणी : ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन

परभणी : ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ईव्हीएमचा मशीनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी वसमत रस्त्यावर ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.
संविधान बचाव अभियाना अंतर्गत परभणी येथे १ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचा मेळावा घेण्यात आला.
शहरातील राष्ट्रवादी भवन येथे हा मेळावा पार पडल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेस व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वसमत रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. भाजप सरकारच्या वतीने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला जात असल्याने ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अर्धातास केलेल्या या आंदोलनामुळे वसमत रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, माजी प्रांताध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, मीनाताई खरे, सक्षणा सलगर, सोनाली देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, रेखा आवटे, मीनाताई राऊत, माजी खा.गणेशराव दुधगावकर, अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, माजी खा. सुरेश जाधव, संतोष बोबडे, मनपाचे गटनेते जलालोद्दीन काजी, नगरसेवक विष्णू नवले, जाकेर लाला, सुमंत वाघ, किरण तळेकर, आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Parbhani: Combustion of EVM replication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.