परभणी : चाकूचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:03 AM2019-01-08T00:03:11+5:302019-01-08T00:03:40+5:30

खरेदी केलेला कापूस विक्री करून परतत असताना टेम्पो आडवून चाकुचा धाक दाखवून कापूस व्यापाºयाचे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना पाथरी तालुक्यातील सोनपेठ-पाथरी रोडवरील अमराईजवळ ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास घडली.

Parbhani: Caught the stalker with a knife and plunder the trader | परभणी : चाकूचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यास लुटले

परभणी : चाकूचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यास लुटले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : खरेदी केलेला कापूस विक्री करून परतत असताना टेम्पो आडवून चाकुचा धाक दाखवून कापूस व्यापाºयाचे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना पाथरी तालुक्यातील सोनपेठ-पाथरी रोडवरील अमराईजवळ ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील एकतानगर येथील कापसाचे व्यापारी पुरुषोत्तम सोमाणी यांनी ६ जानेवारी रोजी मोंढा परिसरात खरेदी केलेला अंदाजे १८३ क्विंटल कापूस टेम्पो क्रमांक एम.एच.०४-बी.डी. ६६२८ व एम.एच. ४५-०६१२ या दोन टेम्पोमध्ये भरून परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील एसके जिनिंगमध्ये नेला होता. एम.एच. ४५/०६१२ या टेम्पोला भाडे असल्याने तो गंगाखेडला गेला. तर कापूस विक्री करून जनावरांना लागणारी २०० पोते पेंड एम.एच.०४ डी.डी.६६२८ या टेम्पोमध्ये भरून व जिनिंग मालकाकडून ३ लाख रुपये उचल घेऊन टेम्पो पाथरीकडे निघाला. हा टेम्पो सोनपेठ- पाथरी रोडवरील अमराई जवळ येताच पाठीमागून दुचाकीवरून तीन अज्ञात चोरटे आले. त्यांनी टेम्पोला ओव्हरटेक करून चालकाला काठीचा धाक दाखवून थांबविण्यास भाग पाडले. दुचाकी आडवी लावून चाकुचा धाक दाखवून टेम्पोचे दार उघडण्यास सांगितले. दार उघडताच चालक बाजूच्या शेतात पळाला. चोरांनी कॅबीनमध्ये प्रवेश करून पुरुषोत्तम सोमाणी यांना चाकुचा धाक दाखविताच भीती पोटी सोमाणी बाजूच्या शेतात जावून लपले. थोड्या वेळाने चोरट्यांनी दुचाकीवर पळ काढला. चोरटे गेल्याचे लक्षात येताच सोमाणी टेम्पोजवळ आले. डिक्कीमध्ये ठेवलेले ३ लाख रुपये व कापूस विक्री केलेल्या पावत्या, मफरेल हे दिसून न आल्याने चोरट्यांनी पैसे घेऊन गेल्याची खात्री झाली. त्याच वेळी सोमाणी यांनी मोबाईलवरून पाथरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुरुषोत्तम सोमाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Parbhani: Caught the stalker with a knife and plunder the trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.