परभणी :आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:46 PM2018-09-24T23:46:16+5:302018-09-24T23:52:47+5:30

जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सप्टेंबर महिन्याकरीता आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर केले असून २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना हे नियतन वितरित करण्यात येणार आहे.

Parbhani: Allotment of another 204 KL kerosene is approved | परभणी :आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर

परभणी :आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सप्टेंबर महिन्याकरीता आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर केले असून २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना हे नियतन वितरित करण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यात रॉकेल नियतन वितरणात अनियमितता झाल्याचा प्रकार जिंतूर तहसील कार्यालयाच्या निमित्ताने समोर आला होता. पुरवठा विभागाच्याच अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नियतन मंजूर करुन दर महिना हजारो लिटर रेशनकार्डधारकांचे रॉकेल काळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्याची बाब समोर आली होती. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी सर्वच रेशनकार्डधारकांकडून गॅस वापरत नाही, याबाबतचे हमीपत्र घेण्याचे आदेश सर्व रेशनदुकानदारांना दिले आहेत. त्यामुळे बनावट रेशनकार्डधारकांची संख्या दाखवून अधिकचे नियतन मिळविणाºया दुकानदारांची गोची झाली आहे. जिल्हाधिकाºयांच्या हमीपत्र मागविण्याच्या आदेशाला जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला तरी परिपूर्ण माहिती जिल्हाधिकाºयांकडे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी जोपर्यंत हमीपत्रधारकांची पूर्ण माहिती येणार नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे पूर्ण रॉकेल नियतन वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी नियमित रॉकेल वितरणातही आखडता हात घेतला आहे. सप्टेंबर महिन्यासाठी जिल्ह्याला ८६४ केएल रॉकेलचे नियतन प्राप्त झाले होते. आॅगस्ट महिन्याचे १४० के.एल. रॉकेल जिल्हा पुरवठा विभागाकडे शिल्लक आहे. यातील सप्टेंबर महिन्याचे ६० टक्के नियतन वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी १९२ केएल रॉकेल नियतन वितरणाचे आदेश काढण्यात आले होते. आता पुन्हा १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांनी २०४ केएल रॉकेल नियतन वितरणाचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना जिल्हाभरात रॉकेल वितरणासाठी देण्यात आले आहे. यामध्ये बहुचर्चित जिंतूर तालुक्याला ३९ केएल रॉकेल मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये ४ वितरकांचा समावेश आहे. चारही वितरकांना १०० टक्के द्वारपोहोच योजनेंतर्गत हे रॉकेल देण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील रॉकेल वितरण बाकी
जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी यापूर्वी सप्टेंबर महिन्यासाठी १९२ केएल रॉकेल मंजूर केले होते. काही अर्धघाऊक विक्रेत्यांनी यातील रॉकेलची उचल केली नसल्याची चर्चा आहे. विशेषत: जिंतूर तहसील कार्यालयाच्या परिसरात रॉकेलचे टँकर उभे आहेत. जिल्हाधिकाºयांनी अचानक रॉकेल नियतनात कपात केल्याने चुकीच्या मार्गाने रॉकेल वितरित करणाºयांचे धाबे दणाणले असून जिल्हाधिकाºयांवरच दबाव आणण्यासाठी रॉकेल न उचलण्याची खेळी काही जणांकडून सुरु असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात कडक भूमिका घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
अहवाल जिल्हा कचेरीस मिळेना
जिंतूर येथील केरोसीन नियतन वितरणात अनियमितता झाल्याचे प्रकरण जवळपास ४० दिवसांपूर्वी उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
याबाबतचा खुलासाही जिंतूर येथील अधिकाºयांकडून मागविण्यात आला आहे; परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतचा अहवाल आणि खुलासा अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत का दिरंगाई केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Parbhani: Allotment of another 204 KL kerosene is approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.