परभणी : १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:03 AM2019-06-14T00:03:06+5:302019-06-14T00:04:17+5:30

मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असला तरी जिल्हा प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेची तयारी सुरू केली असून, यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात १ कोटी २० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़

Parbhani: The aim of plantation of one crore 20 lakhs of trees | परभणी : १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

परभणी : १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

Next

परभणी : १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडला असला तरी जिल्हा प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेची तयारी सुरू केली असून, यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात १ कोटी २० लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़
दरवर्षी पावसाळ्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते़ जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाते़ यावर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासन वृक्ष लागवडीच्या मोहिमेत गुंतले आहे़ सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विभागावर वृक्ष लागवडीची प्रमुख जबाबदारी असून, जिल्हा प्रशासनातील इतर शासकीय कार्यालयांना वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे़ दरवर्षी १ जुलै रोजी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली जाते़ जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात वृक्षारोपण करण्यात येते़ परंतु, यापैकी अनेक झाडे जगत नाहीत़ हा आजवरचा अनुभव आहे़ यावर्षीही लावलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ प्रशासनाच्या वृक्ष लागवड मोहीमेमध्ये लोकांचा सहभाग वाढविला जाणार असून, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती केली जाणार आहे़ तसेच शासकीय यंत्रणांवर शासनाच्या मंत्रालयातून आॅनलाईन नियंत्रण ठेवले जाणार आहे़ प्रत्येक शासकीय कार्यालयाने वृक्ष लागवडीसाठी खड्ड्यांचे खोदकाम केल्यापासून ते वृक्ष लावगड केल्यापर्यंतचा फोटो आॅनलाईन महाफॉरेस्ट या संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे़ विशेष म्हणजे, झाडांचे व्हिडीओ देखील अपलोड करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे यावर्षी ही मोहीम विशेष ठरणार असून, या मोहिमेंतर्गत लावलेली किती झाडे जगतात? याकडे लक्ष लागले आहे़
रेल्वे विभागाची उदासिनता
वृक्ष लागवड मोहिमेसाठी राज्य शासनाच्या अखत्यारित असलेले शासकीय विभाग प्रयत्न करीत असताना दुसरीकडे रेल्वे विभाग मात्र उदासिन असल्याचे दिसून येत आहे़ मागील वर्षी या विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते़; परंतु, रेल्वे विभागाने एकही झाड लावले नाही़ आता यावर्षी देखील या विभागाला १२५० झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून रेल्वे विभागाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे़
विभागांना दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
च्राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे़ त्यामध्ये महसूल विभागाला २९ हजार ४५०, पशू संवर्धन विभागाला ९ हजार २५०, महानगरपालिकेला २ हजार ५००, नगरपालिका प्रशासनाला २५ हजार १२०, सामान्य प्रशासन विभागाला १० हजार ५००, निवासी उपजिल्हाधिकारी विभागास १८००, परिवहन विभागास १८५०, उद्योग विभागाला १५ हजार ७५०, गृह विभागास ८ हजार ७००, जिल्हा कारागृह परिसर ५ हजार, उर्जा विभाग ८ हजार ७५०, सार्वजनिक आरोग्य विभाग २९ हजार ८५०, जिल्हा शल्यचिकित्सक ३ हजार ६००, सार्वजनिक बांधकाम विभाग ७० हजार, जिल्हा परिषद १२ लाख ९७ हजार ९८०, ग्रामपंचायत परिसर २२ लाख ५३ हजार ५००, जलसंधारण विभाग १० हजार, शालेय शिक्षण विभाग ३ लाख ४८ हजार २५०, सामाजिक न्याय विभाग १२ हजार २००, जलसंधारण विभाग ५१ हजार ७५०, कृषी विभाग ६ लाख ६६ हजार ३५०, वन विभाग ४२ लाख २२ हजार, रेशीम उद्योग विभाग १ लाख ५० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़
नेमगिरीत उभारले मॉडेल
च्वृक्षारोपण केल्यानंतर ती झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चित झाडे जगतात़ वन विभागाने नेमरिगीच्या डोंगरावर दगड कोरून झाडे लावली होती़
च्सुरुवातीला दोन-तीन फुटापर्यंत असलेली ही झाडे ८ ते १० फुटापर्यंत वाढली आहेत़ या भागातील लोकांचेही या कामी सहकार्य लाभले़
च्त्यामुळे नेमगिरीतील मॉडेल जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल, अशी माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली़
यावर्षी तीन महिने चालणार मोहीम
च्दरवर्षी जुलै महिन्यातच वृक्ष लागवड मोहीम राबविली जात होती़ यावर्षी मात्र या मोहिमेचा कालावधी वाढविण्यात आला आहे़ वृक्ष लागवडीची संख्या अधिक असल्याने १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत मोहीम राबविली जाणार आहे़ १ जुलै रोजी पुरेसा पाऊस झाला नाही तर प्रतिकात्मक पद्धतीने उद्घाटन करून ही मोहीम सुरू केली जाणार आहे़

Web Title: Parbhani: The aim of plantation of one crore 20 lakhs of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.