एक लाखाची फसवणूक; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:15 AM2018-04-12T00:15:15+5:302018-04-12T00:15:15+5:30

ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्थेंतर्गत जलसंजीवनी मंचचा विभागीय संचालक असल्याचे भासवून १ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

One lacquer fraud; Filed the complaint | एक लाखाची फसवणूक; गुन्हा दाखल

एक लाखाची फसवणूक; गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्थेंतर्गत जलसंजीवनी मंचचा विभागीय संचालक असल्याचे भासवून १ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
शहरातील श्रीहरी नगर येथील रवींद्र रमेशचंद्र अग्रवाल यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार विलास राठोड याने स्वत:ला जलसंजीवनी मंचचा विभागीय संचालक असल्याचे भासवून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी अ‍ॅरोप्लँट टाकण्यासाठी व वितरक नेमण्यासाठी सुमारे १ लाख रुपये जमा केले़ हे पैसे घेत असताना करारही केला़ मात्र करारानुसार कोणतेही साहित्य न पुरविता कराराचा भंग करून १ लाखाची फसवणूक केली़, अशी तक्रार दिली आहे़ त्यावरून विलास राठोड याच्याविरूद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक काशीकर तपास करीत आहेत़

Web Title: One lacquer fraud; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.