मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे तर निधीसाठी दिव्यांगांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:20 AM2018-07-03T00:20:39+5:302018-07-03T00:21:06+5:30

परळी येथील के. धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने पिकांचा व जागेचा मोबदला न दिल्याने पांगरा, वाई लासीना परिसरातील शेतकºयांनी २ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

The movement of the Divyanagang for the benefit of the farmers | मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे तर निधीसाठी दिव्यांगांचे आंदोलन

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे तर निधीसाठी दिव्यांगांचे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परळी येथील के. धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने पिकांचा व जागेचा मोबदला न दिल्याने पांगरा, वाई लासीना परिसरातील शेतकºयांनी २ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
पांगरा ढोणे, वाई लासीना व पिंपळा लोखंडे शिवारातील जमिनीतून पॉवर ग्रेड लाईन टाकण्यात आली आहे. यासाठी के.धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने २८ मे २०१८ रोजी शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे केले. लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आरटीजीएसद्वारे पीक नुकसान व जमिनीचा मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन १५ मे २०१८ रोजी व्यवस्थापक, के.धर्माराव यांनी दिले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अद्यापपर्यंत शेतकºयांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे सोमवारपासून शेतकºयांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. विवेकानंद ढोणे, भानुदास ढोणे, हरजी जाधव, मारोती ढोणे, राजेश लोखंडे, यादव ढोणे, मारोती भलाडे, सोपान ढोणे, केशव ढोणे, गजानन ढोणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मनपा ३ टक्के निधी खर्च करेना...
परभणी- महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी राखीव ठेवलेल्या ३ टक्के निधीतून शहरात योजना राबवाव्यात, या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने धरणे आंदोलन सुरु केले आहे.महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. २.२३ कोटी रुपये शहरात अपंग बांधवांसाठी राखीव असताना मनपा योजना राबवित नाही. २०१५ पासून आजपर्यंत अपंगांना या योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. तेव्हा हा निधी खर्च करण्याची तत्काळ परवानगी द्यावी, याच निधीतून अपंगांसाठी पेंशन योजना सुरु करावी, या मागण्यांसाठी परभणी जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने हे आंदोलन सुरु केले आहे. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिकेत सेलगावकर, सचिव शेख मुजाहेद यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Web Title: The movement of the Divyanagang for the benefit of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.