धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन

By मारोती जुंबडे | Published: January 6, 2024 03:29 PM2024-01-06T15:29:24+5:302024-01-06T15:29:46+5:30

मागील काही दिवसापासून आरक्षण मिळत नसल्याने शिवाजी कारके हा चिंताग्रस्त झाला होता.

Extreme step for Dhangar reservation; The young man ended his life | धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन

धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन

परभणी: तालुक्यातील आर्वी येथील एका २८ वर्षीय युवकाने धनगर आरक्षणासाठी लिंबाच्या झाडाला आत्महत्या केल्याची घटना ६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. शिवाजी दत्तराव कारके असे मयत युवकाचे नाव आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जिल्ह्यासह इतर ठिकाणी झालेल्या मोर्चे व बैठकांमध्ये परभणी तालुक्यातील आर्वी येथील शिवाजी दतराव कारके हा उपस्थित राहत होता. मात्र मागील काही दिवसापासून आरक्षण मिळत नसल्याने शिवाजी कारके हा चिंताग्रस्त झाला होता. ६ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास शिवाजी कारके या युवकाने आर्वी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे समोर आले.

घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे, आचार्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. तेव्हा नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी कारके हा तरुण आरक्षणासाठी आगृही होता. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Extreme step for Dhangar reservation; The young man ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.