नीट परीक्षेतील दोन प्रश्नांची उत्तरे एजन्सीने दिली चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:47 AM2019-05-31T11:47:50+5:302019-05-31T11:53:55+5:30

वेबसाईटवर या दोन प्रश्नांसंदर्भात ३१ मे रोजी रात्री ११़५० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येतील

The answer to the two questions in the NEET examination was incorrect | नीट परीक्षेतील दोन प्रश्नांची उत्तरे एजन्सीने दिली चुकीची

नीट परीक्षेतील दोन प्रश्नांची उत्तरे एजन्सीने दिली चुकीची

googlenewsNext
ठळक मुद्दे ५ मे रोजी देशभरात प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यात आली जीवशास्त्र विषयाचे तज्ज्ञ डॉ़ मारोती हुलसुरे यांनी उत्तरे चूक असल्याची माहिती दिली़

परभणी :  वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीटच्या परीक्षेची चॅलेंज अन्सर की गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केले. त्यामध्ये जीवशास्त्र विषयातील दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची दर्शविण्यात आली असल्याची माहिती या विषयाचे तज्ज्ञ डॉ़ मारोती हुलसुरे यांनी दिली़

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ५ मे रोजी देशभरात प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यात आली होती़ या परीक्षेची चॅलेंज अन्सर की गुरुवारी या परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने www.ntaneet.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे़ त्यामध्ये जीवशास्त्र विषयाच्या चॅलेंज अन्सर की मध्ये प्रश्न क्रमांक १- कन्सीडर द फॉलिंग स्टेटमेंट मध्ये ए) कोर्इंझाईम आॅर मेटल आयन दॅट ईज टाईटली बाऊंड टू एनझाईम प्रोटीन ईज कॉल्ड प्रोस्थेटीक ग्रुप़ ब) अ कम्पलीट कॅटालाईटीक अ‍ॅक्टीव्ह एनझाईम वुईथ ईटस् बाऊंड प्रोस्थेटीक ग्रुप इज कॉल्ड अपोएनझाईम हे स्टेटमेंट दिले असून, त्यात पर्याय १) ए ईज ट्रू बट बी ईज फॉल्स़ २) बोथ ए अँड बी आर फॉल्स ३) ए इज फॉल्स बट बी इज ट्रू ४) बोथ ए अँड बी आर ट्रु  हे चार पर्याय उत्तरा दाखल दिले आहेत़ त्यात नॅशनल टेस्टींग एजन्सीने पर्याय क्रमांक १ हे उत्तरादाखल दिले आहे़ प्रत्यक्षात एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमानुसार पर्याय क्रमांक २ हे उत्तर बरोबर आहे़.

अशीच गफलत आणखी एका प्रश्नात करण्यात आली आहे़ वुईच ऑफ द फॉलविंग स्टेटमेंट इ करेक्ट ? १) कॉर्निया कन्सीट ऑफ डेन्स कनेक्टीव्ह टिश्यू ऑफ इलॅस्टिन अँड कॅन रिपेअर इटसेल्फ़ २) कॉर्निया इज ए ट्रान्सपरंट लेअर वुईच इज हायली व्हॅस्कुलाराईज ३) कार्निया कन्स्टीट ऑफ डेन्स मॅट्रीक्स ऑफ कोलॅजन अँड इज मोस्ट सेन्सीटीव्ह पोर्सेशन ऑफ द आय ४) कॉर्निया इज अ‍ॅॅन एक्सटरनल, ट्रान्सपरंट अँड प्रोटेक्टीव्ह प्रोटीनॅसीयस कव्हरींग आॅफ द आयबॉल़ यामध्ये एनटीएने दिलेले उत्तर पर्याय क्रमांक ३ आहे़ पण अभ्यासक्रमानुसार पर्याय क्रमांक ४ हे उत्तर आहे़ 

विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदरील वेबसाईटवर या दोन प्रश्नांसंदर्भात ३१ मे रोजी रात्री ११़५० वाजेपर्यंत यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन परभणी येथील बायोलॉजीचे तज्ज्ञ डॉ़ मारोती हुलसुरे यांनी केले आहे़.

Web Title: The answer to the two questions in the NEET examination was incorrect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.