आपण पाहतो ते व्हिडीओ कोण बनवतं?

By Admin | Published: February 8, 2017 02:58 PM2017-02-08T14:58:53+5:302017-02-08T14:58:53+5:30

तुम्ही केक्स, ब्राऊनीज किंवा कमाल तंदूर असे पदार्थ कसे झटपट करायचे याचे छोटे छोटे व्हिडीओ पाहिले असणारच ना..

Who makes the video you watch? | आपण पाहतो ते व्हिडीओ कोण बनवतं?

आपण पाहतो ते व्हिडीओ कोण बनवतं?

googlenewsNext

बझफीड

तुम्ही केक्स, ब्राऊनीज किंवा कमाल तंदूर असे पदार्थ कसे झटपट करायचे याचे छोटे छोटे व्हिडीओ पाहिले असणारच ना... किंवा ट्रम्प जिंकला यावर काही खुमासदार पद्धतीने विनोद केलेले व्हिडीओ? तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया साइटवर असाल तर तुम्हाला हे व्हिडीओ नक्कीच बघायला मिळाले असणार.
तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की हे व्हिडीओ, अशा स्टोरीज कोण तयार करतं? तर त्याला उत्तर बझफीड असं आहे. 
बझफीड ही न्यू यॉर्क शहरात असलेली एक इंटरनेट मीडिया कंपनी आहे. ते स्वत:चं स्पष्टीकरण देताना, आम्ही एक सोशल बातम्या आणि मनोरंजनासाठीची कंपनी आहोत असं देतात. त्यांना रोजच्या, अगदी नेहमीच्या बातम्यांमध्ये रस नाही. पण ती बातमी श्रोत्यांपर्यंत कशी पोचवायची हे त्यांना पक्कं माहिती आहे. आणि नुसतंच बातमी नाही; पण त्या बातमीमागच्या गोष्टींमध्ये त्यांना अधिक रस आहे. 
बझफीडची वेबसाइटसुद्धा आहे आणि ते व्हिडीओपण तयार करत असतात. वेबसाइटवर एखाद्या बातमीची उकल करणारे लेख असतात आणि त्याच्या अनुषंगाने चित्रफिती असतात. म्हणजे गेल्याच काही दिवसांपूवी एक स्टोरी होती ती भारतात सध्या दाढी वाढवण्याची फॅशन आहे त्याबद्दल. तर त्यात त्यांनी सध्या मुलांना असं का करावंसं वाटतं याचा शोध घेतला आणि काही मुलांचे इंटरव्ह्यूजही घेतले. खूपच हीट झाली होती ती स्टोरी.
याबरोबरच त्यांचं यू ट्यूबवर एक चॅनेलही आहे. त्यामध्ये अनेक विविध प्रकाराच्या व्हिडीओजची निर्मिती ते करत असतात. त्याचा प्रेक्षकवर्ग आता एवढा मोठा झाला आहे, की खुद्द यू ट्यूबने त्यांना काही विश्श फिल्म्स करण्याचं कंत्राटच दिलं आहे...
भारी ना!
तर बघायला विसरू नका! बझफीड

https://www.buzzfeed.com/?country=in  

Web Title: Who makes the video you watch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.