इंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:33 PM2018-08-09T17:33:07+5:302018-08-09T17:33:53+5:30

माझ्या कामाची जास्त गरज कुणाला आहे? तंत्रज्ञानानं कारमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे तसं खेडय़ापाडय़ातही काम होणंही गरजेचं आहे. मी ग्रामीण भागाची वाट निवडली.

when An engineer goes to the tribal village.. | इंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.

इंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.

Next
ठळक मुद्देअनिश्चितता हेच वास्तव आहे तर त्या वास्तवालाच मला भिडायचंय.                                                                                                                  

- सागर बेंद्रे

माझं गाव अरणगाव. पुण्यापासून 60 किमी दूर. दहावीर्पयतचं शिक्षण जवळच्याच उरलंगावला झालं. शाळेसाठी दररोज 11 किलोमीटर पायपीट. या अनेक वर्षाच्या पायपिटीतच शेती आणि गावाकडचे प्रश्न आपोआप उमगत गेले. समाजामध्ये प्रचलित असलेल्या आणि बाजारामध्ये ज्याला जास्त संधी आहेत अशा अभियांत्रिकीला मी प्रवेश घेतला. पण, यात एक चांगली गोष्ट घडली. अभियांत्रिकीसाठी पुण्यात आल्यावर दररोजच वर्तमानपत्नं वाचायला मिळू लागली. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. यातूनच समाजाशी ओळखही वाढू लागली. कॉलेजमध्ये असताना लहान लहान सामाजिक कृतींमध्ये सहभागी व्हायला लागलो. यातून नवनवीन प्रश्न समजायला लागले. एकंदरीत अभियांत्रिकीचं शिक्षण चांगलंच मानवलं. कॉलेजचं जीवन मजेत सुरू होतं. कधी कधी स्पर्धामय जगण्याचा कंटाळा यायचा, त्नास व्हायचा. सोबतच समाजात घडणार्‍या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल संतापही यायचा. त्यावेळर्पयत मला माहिती असलेले सामाजिक कार्याचे दोनच मार्ग- प्रशासकीय सेवा आणि चळवळीतला कार्यकर्ता. ते दोन्ही माझ्या पचनी पडणारं नव्हतं. ‘आपल्या शिक्षणाचा समाजासाठी काय उपयोग होईल?’ या प्रशाच्या उत्तरात मी ‘निर्माण’जवळ येऊन थांबलो. सर्च संस्थेमध्ये निर्माण उपक्र म चालतो तिथं समाजातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करणारी अनेक माणसं भेटली. वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणारे समवयस्कही भेटले.
माझ्या कामाचा समाजावर काय परिणाम होतो हे जास्त महत्त्वाचं वाटू लागलं. काम ‘कुठं’ करायचं हा शोध सुरू झाला. सामाजिक प्रश्न, त्यातली माझी भूमिका यावर अभ्यास सुरू झाला. छोटय़ा छोटय़ा कृतींपेक्षा एका विषयात खोल जाणं अधिक अर्थपूर्ण वाटायला लागलं. निर्माणचं पहिलं शिबिर पूर्ण करून गेल्यानंतर सर्वप्रथम मनाशी पक्कं केलं की आपण कॅम्पस इंटरव्ह्यू द्यायचे नाहीत. पण मग काय करायचं, हा प्रश्न होताच. कारण समाजासाठीच काम करायचं हा निर्धार पक्का होता. इंजिनिअरिंग संपल्याबरोबर लगेचच एसबीआय, यूथ फॉर इंडिया फेलोशिप या सामाजिक संस्थेबरोबर मध्य प्रदेशमधील बैतुल जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली. बैतुल हा आदिवासीबहुल भाग. गोंड आणि कोरकू आदिवासी समुदायाची वस्ती. येथील मुख्य व्यवसाय पावसावर आधारित शेती. शेतीतून मिळणारे तोकडे उत्पन्न, रोजगाराच्या अपुर्‍या संधी, त्यामुळे होणारे स्थलांतर, आरोग्य अशा अनेक समस्या या भागात तीव्र स्वरुपाच्या. पाण्याची टंचाई. शेती रखरखीत झालेली. येथील बारक्या जनावरांना पाहिल्यावरही काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. यातलाच एक बोलका अनुभव. एका आजोबांना विचारलं, इथली जनावरं अशी का दिसतात? ते म्हणाले, ‘या काही वर्षात पाऊस कमीच झाला आहे. गवताचा पत्ताच नाही. माणसालाच नीट खायला मिळत नाही. जनावरांना कुठून देणार. जमिनीत मुबलक पाणी; पण वीज नाही. त्यामुळे डिझेल इंजिन वापरावं लागतं. पण त्याचा खर्च परवडत नाही. पावसाळ्यात तर पूर्ण बत्ती गूल असते. 
अनेकांशी संवाद साधला. यातून एक गोष्ट समजायला लागली की पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर आहे. पाऊस वेळेवर पडत नाही. शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे साधन नसल्यामुळे खरीप हंगामात स्थलांतर करावे लागते. अनेक शेतांर्पयत वीज पोहोचली नव्हती. सर्व प्रश्न खूपच गुंतागुंतीचे. गावात राहणारा, शेती, मजुरी करणारा माणूस प्रत्येक गोष्टीसाठी नफ्याच्या बाजारपेठेवर अवलंबून. यातून त्याचे शोषणच होत होते. या सर्व समस्यांना समजून घेत आम्ही पर्यायी ऊर्जा संसाधनांचा उपयोग शेती आणि ग्रामीण पातळीवरील समस्या सोडविण्याच्या हेतूने करण्यास सुरु वात केली. पर्यावरणपूरक तंत्नज्ञान आदिवासी गावांर्पयत पोहोचवणं, तांत्रिक साधनांच्या एकत्नीकरणात आणि अंमलबजावणी प्रक्रि येमध्ये लोकांचा सहभाग वाढवणं, देखरेखीसाठी सक्रि य लोकांचा गट तयार करणं असा कार्यक्र म आम्ही हाती घेतला. लोकांना त्याबाबतची सर्व माहिती द्यायला सुरु वात केली. 
शेतीसाठी पाणी उपसण्याचा खर्च कमी करण्याच्या हेतूने मी सोलर पंपचा विचार करू लागलो. पण, तंत्नज्ञान महागडं होतं. एका शेतकर्‍याला परवडणार नाही पण समूहाला परवडू शकेल या उद्देशाने सहज वेगवेगळ्या शेतात नेण्याजोगी सोलर पंप यंत्नणा तयार केली आणि शेतकर्‍यांच्या  गटामध्ये वापरासाठी दिली. या यंत्नणा बनवण्याच्या कामात लोकांचा सहभाग वाढवला. त्यामुळे यंत्नणा अधिक सशक्त होत गेली. पाच गावांमधील गटामध्ये दिलेली ही यंत्नणा पाणी उपसण्यासाठी लागणारा खर्च कमी करणारी ठरली. सोबतच डिझेल इंजिनमधून होणारा कार्बन उत्सर्गही थांबला. 
या भागात काम करताना एक गोष्ट लक्षात आली की आदिवासी गावांमध्ये पथदिवेच नाही. वीज गेली की काळा गुडुप्प अंधार. यावर उपाय म्हणून काय करता येईल? बाजारामध्ये मिळणारी यंत्नणा खूपच महाग. चोरीचं प्रमाणही जास्त. शिवाय देखभाल करणारी व्यवस्थाच नाही. या सर्व बाबी विचारात घेत सर्वप्रथम किंमत कमी करण्याच्या दृष्टीने लोखंडी खांबाला पर्याय म्हणून येथे सहज उपलब्ध असणार्‍या बांबूचा वापर केला. स्ट्रीट लाइटचे बाकी सुटे भाग विकत घेऊन महिलांच्या गटाद्वारे त्यांची जुळवणी केली. या पूर्ण कामामध्ये महिला आणि तरुणांचा सहभाग वाढवण्यावर, मूलभूत माहिती देण्यावर भर होता. पुढील काळात येणारा देखभाल खर्च लोकांनी सक्रि यतेने करावा या हेतूने एक पथदिवा कमीत कमी तीन घरांना उजेड देईल या पद्धतीने बसविला. पथदिव्यांच्या सुधारणेसाठी लोकांनी सक्रि यतेने सरकारी यंत्नणेचा सहभाग घडवून आणावा अथवा लोकांनी मिळून खर्च करावा आणि यंत्नणा सतत चालू ठेवावी तसेच यातून सौर ऊर्जेच्या साधनाबद्दलची जनजागृती घडवून आणणं हा उद्देश होता. तो बर्‍याच प्रमाणात पूर्ण झाला. 
या आदिवासी भागात बहुतेक घरी लाकडाचा वापर स्वयंपाकासाठी होतो. यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न तर होताच, सोबत पर्यावरणाचाही होता. यावर उपाय म्हणून ‘बायफ’ने तयार केलेल्या बायोगॅस मॉडेलची अंमलबजावणी सुरू केली. आज अनेक घरी पूर्ण स्वयंपाक बायोगॅसवर होतो. तसेच यातून बाहेर पडणार्‍या गाळावर प्रक्रि या करून जैविक उत्पादनांचा वापर शेतीमध्ये करण्यास सुरु वात झाली. याव्यतिरिक्त शेतीसाठी पाणी उपसण्यासाठी लागणारा इंधनाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने पवनचक्की आणि हायड्रम पंपची यंत्नणा तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. 
हा वर्षभराचा प्रवास माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. विषयाची व्यापकता समजायला सुरुवात झाली. विविध तांत्रिक उपाययोजनांवर काम करण्याची एक जिवंत प्रयोगशाळाच माझ्यासाठी खुली झाली. गावामध्ये फिरताना अनेक ठिकाणी लोकांनी शोधून काढलेले नावीन्यपूर्ण उपाय पहावयास मिळतात. ते पाहून जाणवतं की प्रश्नांची तीव्रता सोसणार्‍या लोकांचा उपाययोजनेच्या प्रक्रि येमध्ये सहभाग असणं हे त्या उपाययोजनेची सहजता, नेमकेपणा आणि पर्यायानं शाश्वतता वाढवते.
    हे आता स्पष्ट झालं आहे की तंत्नज्ञान आज माणुसकी ओलांडून पुढे जात आहे. आज मोठमोठय़ा कारमध्येही सुधारणेची गरज आहे आणि शेतकर्‍याकडे असलेल्या बैलगाडीतही. पण यातील बैलगाडीतील सुधारणा मला जास्त गरजेची आणि अर्थपूर्ण वाटते. पुढचं ध्येय ठरलं आहे. पर्यावरणातील बदलाच्या अनुषंगाने पर्यायी ऊर्जा संसाधनांचा शेती आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणं. अनिश्चितता हेच वास्तव आहे तर त्या वास्तवालाच मला भिडायचंय.                                
                                                                                 

(सागर इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे.)                                                                              
  
शब्दांकन - पराग मगर

**
 

निर्माणमध्ये सहभागी व्हायचंय?

निर्माणची नवीन बॅच जानेवारी 2019 मध्ये सुरू होत आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2018 आहे. http://nirman.mkcl.org/
या वेबसाइटवर निर्माणची माहिती आणि अर्ज मिळू शकेल.

Web Title: when An engineer goes to the tribal village..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.