चॅम्पियन व्हायला काय लागतं?

By admin | Published: July 18, 2014 12:13 PM2014-07-18T12:13:52+5:302014-07-18T12:13:52+5:30

रात्र रात्र डोळे फोडून पाहिला फुटबॉल वर्ल्डकप? एन्जॉय केला?

What happens to being a champion? | चॅम्पियन व्हायला काय लागतं?

चॅम्पियन व्हायला काय लागतं?

Next
रात्र रात्र डोळे फोडून  पाहिला फुटबॉल वर्ल्डकप? एन्जॉय केला? मेस्सी चालायला  पाहिजे होता यार..
नेयमार पडला नसता ना तर ब्राझील कुठच्या कुठं गेलं असतं..जर्मनीची टीम काय चालली यार,
एकदम अनबिलिव्हेबल!!
- फुटबॉल आवडो  ना आवडो, कळो, न कळो ही अशी चर्चा केली तुम्ही? ओके, गुड! 
-मग पुढे? खेळ खल्लास,  किस्सा खत्तम??अजिबात नाही. खरंतर जिथं फायनल संपली तिथून पुढेच  एक एकदम भन्नाट,   ‘रिअल थ्रिलर’  अशी कहाणी सुरू होतेय. जर्मनीच्या जिंकण्याची कहाणी! 
जर्मन म्हणून  उदयास आलेल्या  नव्याकोर्‍या ‘तरुण’ राष्ट्रवादाची कहाणी! इतरांच्या हरण्याची, 
मोडून पडण्याची अपयशी कहाणी! दुनियाभर ज्याप्रकारचा थ्रिलिंग, डॅशिंग आणि प्रोफेशनल फुटबॉल खेळला जातो, तसा आजच्या घडीला भारतात खेळला जात नाही, पण फुटबॉलच्या मैदानात 
फक्त ९0 मिन्टाच्या ( आणि कधी कधी एक्स्ट्रा टाइम-टाय ब्रेकरच्या) काळात जे जे घडत होतं,
त्यातलं सूत्र लक्षात घेतलं, तर आपल्या ‘प्रोफेशनल’ जगण्याला चॅम्पियन बनवण्याची काही सूत्रं 
सहज  दिसू  शकतात. जिंकण्याच्या अतीव जल्लोषात आणि हरण्याच्या  अकल्पित आक्रोशात 
ती सूत्रं हरवून जाऊ नयेत म्हणून या अंकात ही फुटबॉलपलीकडच्या ‘फुटबॉल’ची गोष्ट.
 
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com
 

 

Web Title: What happens to being a champion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.