नस

By Admin | Published: March 31, 2016 02:44 PM2016-03-31T14:44:58+5:302016-03-31T14:44:58+5:30

सलाइन लावायचं तर माझ्या हाताची शीर कष्ट न करता कधीच सापडत नसे. नर्स हात दाबून दाबून शोध शोध शोधायची. चापटय़ा मारायची. सुई लावायची, काढायची, पण माझी नस काही सापडत नसे! ती सापडली की किमो सुरूच. एकच नस सतत वापरल्यानं ती दुखावली गेली आणि त्यामुळे हात आखडला गेला. इतका की दाराची वरची कडी काढताना किंवा जेवताना टेबलावर जरा लांब असलेलं भांडं घेतानाही हातात भयंकर कळ जायची.

Vein | नस

नस

googlenewsNext

कॅन्सर डेज् - ऐन विशीत कॅन्सरशी सामना करून मिळवलेल्या हिमतीची जिगरबाज गोष्ट

 
 
माझ्या डाव्या ब्रेस्टमध्ये गाठ होती. कॅन्सरची गाठ.
ही गाठ पहिल्यांदा ऑपरेट केली ती डॉ. व्यास यांनी. त्यानंतर मग डाव्या-उजव्या ब्रेस्टवर लहान-मोठी अनेक ऑपरेशन्स झाली. टाके घातल्याचे व्रण, रेडीएशन्सचं मार्किंग अशा अनेक खुणा दिसू लागल्या. 
आज मला त्या खुणा ही माङया अंगावरची मेडल्स वाटतात. मी दिलेल्या मानसिक लढय़ाच्या त्या गौरवखुणा आहेत असं आता वाटतं.
पण तेव्हा ते सोपं नव्हतं. कॅन्सरची ट्रीटमेण्ट सुरू झाली. किमोथेरपीसाठी औषधं सलाईनमधून द्यावी लागायची. त्यासाठी हाताला सुई टोचणं हे मोठं टास्क असायचं. सुई टोचणारी नर्स आणि मी, आम्हा दोघींसाठीही. 
कारण माझी शीर कष्ट न करता कधीच सापडत नसे. नर्स हात दाबून दाबून शोध शोध शोधायची. बोटांनी चापटय़ा मारायची. सुई लावायची, काढायची, तिला नाही जमलं तर दुस:या नर्सला बोलावायची. या सगळ्यात माझा पेशन्स संपायचा. त्यामुळे मी सतत मनात म्हणायचे, ‘‘नस मिळू दे नर्सला’’! 
तसंही सुई टोचणं ही बाब काही सुखद आणि मनाला आनंद देणा:या गोष्टींमध्ये मोडत नाहीच. नर्ससमोर बसलं की एरव्हीही आपण मनाची तयारी करतो की पुढच्या साधारणत: मिनिटभरात आपल्याला सुई टोचण्याचं काम संपणार आहे आणि आपल्या मनावरचा भार हलका होणार आहे. 
पण नर्सला नस मिळेना..आणि माझं ग्रहण काही सुटेना..असं दरवेळी व्हायचं. 
त्यामुळे किमोच्यावेळी, ऑपरेशनच्यावेळी मला सर्वात जास्त भीती सुईचीच वाटायची. डाव्या ब्रेस्टचं ऑपरेशन झालं असल्यानं आयुष्यभर कोणत्याही प्रकारची सुई टोचायची झाल्यास ती उजव्या हातावरच टोचायची, असं मला सांगण्यात आलं होतं. पण माझी नस न मिळणं हे फक्त मुंबईच्याच नाही तर लडाखमधल्या नर्सलाही जमत नाहीये हे जेव्हा मला कळलं तेव्हा प्रॉब्लेम नर्सचा नसून माझ्या नसचा आहे हे मला कळून चुकलं होतं. लडाखला फिरायला गेले असताना हाय आल्टिट्यूडमुळे प्रचंड उलट्या होत होत्या. तेव्हा तिथल्या लोकल हॉस्पिटलमध्ये गेलो असताना तिथल्या नर्सलाही माझी नस सापडली नव्हती.  
पण या किमोथेरपीसाठी सलाईन देण्यासाठी सतत सुई टोचावी लागे. एकच नस सतत वापरल्यानं ती दुखावली गेली होती आणि त्यामुळे हात आखडला गेला तो इतका की खाली मोकळा सोडता येईना. त्यामुळे रस्त्यातून चालताना मी हात आखडता घेऊ लागले. दाराची वरची कडी काढताना किंवा जेवताना टेबलावर जरा लांब असेलेलं भांड घेण्यासाठी जरी हात लांब केला की हातातनं भयंकर कळ जायची. खूप घाम फुटायचा. भीती वाटायची. मग हळूहळू मी उजवा हात वापरणंच बंद केलं, मी लेफ्टी असल्यानं माझं तसं  भागत होतं. पण किमो जसजशा वाढत होत्या तसतसा हात अधिकाधिक आखडत होता. रात्री झोपताना उजवा हात चुकून अंगाखाली आला तर कळवळून जाग यायची. त्यासाठीचे व्यायाम डॉक्टरांनी सांगितले होते. मसाज करायची पद्धत सांगितली होती. पण किमो चालू असल्यानं हाताला आराम मिळत नव्हता,त्याचं दुखणं वाढत होतं. पण ते सहन करत होता होईतोवर नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न सुरू झाला.
 आणि अशी लढाई माझी एकटीचीच नव्हती. पट्राटा हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक पेशंट किंवा कॅन्सर झालेला कोणताही पेशंट हे एकमेकांपेक्षा वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांचे झगडेही वेगळे असतात. एकाच अवयवाचा कॅन्सर झालेल्या दोन पेशंटची ट्रिटमेंट, त्यांना देण्यात य़ेणारी औषधं आणि त्यावर त्यांच्या शरीराची रिअॅक्ट करण्याची पद्धत हे सगळंसुद्धा वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे नुसती उपचार पद्धत नव्हे तर कॅन्सरशी लढता लढता तुम्ही एक नॉर्मल आयुष्य कसं जगू शकाल याची टाटा हॉस्पिटल सर्वतोपरीनं काळजी घेतं. ऑपरेशनमुळे आखडलेले सांधे असतील किंवा माङयासारख्या पेशंटचा हाताचा प्रॉब्लेम, पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अन्य प्रकारच्या समस्या असे किती प्रश्न असतात.
त्यासाठी मदतीला धावून जाणारं ‘वी केअर’ हे कॅन्सर पेशंटनीचं उभारलेलं कार्यकर्त्यांचे एक नेटवर्क आहे. ताज हॉटेल्सतर्फेचालवलं जाणारं अन्नछत्र, कॅन्सरवरची पुस्तकं, इतकचं नव्हे तर मुंबईबाहेरु न येणा:या पेशंटससाठी खास टाटा हॉस्पिटलच्या आवारात केलेली रेल्वे र्ङिाव्हेशनची सोय या सगळ्या सुविधांमुळे रु ग्णाच्या कॅन्सरच्या वेदना थोड्याफार तरी सुसह्य होतात. देशाच्या कानाकोप:यातून इथं पेशंट्स येतात. आणि प्रत्येकाच्या कहाण्या वेगळ्या असतात.
        म्हणूनच कॅन्सर हा फक्त एका व्यक्तीला होणारा रोग नाहीये, तर कॅन्सरमुळे एका संपुर्ण कुटूंबावर परिणाम होतं. पण त्यातही आशेची, उमेदीची गोष्ट हीच की कॅन्सरचं योग्यवेळी झालेलं निदान तुम्हाला आयुष्याची साथ सोडू देत नाही.  
 
शची मराठे
shachimarathe23@gmail.com
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)
 
 
 

 

Web Title: Vein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.