मौका मौका - आपली ताकद जोखण्याचं सोपं सूत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 04:06 PM2019-07-03T16:06:28+5:302019-07-03T16:07:09+5:30

आपली ताकद काय? आपली कच्ची बाजू कोणती? संधी कुठं आहे? आणि धोका कोणता आहे, हेच माहिती नसेल तर आपण काय करिअर करणार?

Opportunity chance - the simplest formula for your strength! | मौका मौका - आपली ताकद जोखण्याचं सोपं सूत्र!

मौका मौका - आपली ताकद जोखण्याचं सोपं सूत्र!

Next
ठळक मुद्दे ‘स्व’ची ओळख होणं हे सॉफ्ट स्किलमधलं अपरिहार्य शास्र आहे. आणि यशाचं शस्रसुद्धा!

- डॉ. भूषण केळकर

स्वोट अ‍ॅनालिसिस कसं करायचं? असं अनेकांनी विचारलं.  स्वतर्‍ला आपली नीट ओळख होईल आणि त्यानुसार करिअर निवडता येईल त्यासाठी काय करायचं, असे प्रश्न अनेकांनी विचारले. तर त्यासाठी स्वोट अ‍ॅनालिसिस करायला हवं, ते करून तुम्ही काही गोष्टी नीट मांडूपण शकाल यासाठी एक महत्त्वाची गोष्ट करायला लागेल ती म्हणजे त्यासाठी वेळ देणं. आणि मुद्दाम वेळ देणं!
बहुतांशी वेळेला मुले-मुली या प्रकारचं अ‍ॅनालिसिस करणंच पुढं ढकलतात. आणि त्यामुळे पुढील अनेक निर्णयांवर त्याचा परिणाम होतो.
आपली नेमकी 231ील्लॅ3ँ(2) म्हणजे सामथ्र्य काय व कमतरता 6ीं‘ल्ली22(6) काय हे ओळखणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला ते एका उत्तम उदाहरणाने सांगतो.
माझ्या आगामी पुस्तकामध्ये मी 23 अशा लोकांची प्रोफाइल्स घेतली आहेत की ज्यांना नोकरी सहज मिळत होती; पण त्यांनी धाडस पत्करत व्यवसाय सुरू केला. कोणताही आधार नसताना किंवा कुटुंबाचा वारसा नसताना त्यांनी व्यवसाय करायचा निर्णय घेतला. अशातील एक मुलगा तो दहावीला गणितात व बारावीला इंग्रजीत नापास झाला आणि पुढे तो बी.कॉम.पण होऊ शकला नाही. मात्र त्यानं अचूक ओळखलं की आपली स्ट्रेन्थ आहे अत्यंत नीट बोलता येणं आणि सचोटीने काम करणं.  गिर्‍हाइकांचा विश्वास संपादन करणं. या मुलाने वयाच्या चोविसाव्या वर्षी शिक्षणावर फार भर न देता व्यवसाय सुरू केला. जो मुलगा अत्यंत गरिबीत वाढला होता.  त्याची मुलाखत मी घेतली ती त्याच्या पाच कोटीच्या फ्लॅटमध्ये आणि तो मला सोडायला आला होता त्याच्या मर्सिडीसमधून. 
तो म्हणाला की, फॉर्मल शिक्षणात रस नसणं हा माझा  विकनेस मी ओळखला; पण त्याचबरोबर मी माझी नेमकी स्ट्रेन्थपण ओळखली आणि त्यानुसार नेमकी थ्रेट म्हणजे धोका काय आहे हे ओळखून ती टाळून मी अपॉच्युर्निटी म्हणजे संधीवर मेहनत घेतली. जीव तोडून काम केलं आणि आज मी यशस्वी आहे. तो मला हेपण म्हणाला की, तो आता 25 लोकांना नोकरीवर ठेवून आहे आणि त्याला इच्छा आहे ती लंडनमध्ये ऑफिस उघडण्याची. ते त्याचे स्वप्न यासाठी आहे की इंग्रजी विषयानं त्याला बारावीत दगा दिला होता. आता त्याला इंग्लंडमध्ये त्या लोकांना पगार द्यायचाय!
आता बोला! भारी आहे की नाही!
स्वोट अ‍ॅनालिसीसची चौकट; त्यातील तांत्रिक बाबी वगैरे तुम्हाला सहज इंटरनेटवर सापडतील; परंतु मला वाटतं की या गोष्टीतून या जिवंत माणसाच्या दाखवल्यातून तुम्हाला जेवढं स्वोट कळलं ते अधिक सहज आणि समजणारं असेल!
स्वोट हे तंत्र अमेरिकन आहे. हे तंत्र तुम्हाला करिअर उत्तम बनवण्याचं स्वातंत्र्य नक्की देईल!
मूळचा यवतमाळचा असणारा आणि गणित व गुंतवणूक यात रस असणारा मुलगा सायन्स करिअर सोडून वेल सेटवर उत्तम काम करतोय. इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष उत्तम पास होऊनसुद्धा अ‍ॅनिमिनेशनमध्ये विलक्षण रस असणारा चेतन देशमुख तुमच्या-माझ्यासारख्या भारतीय मध्यमवर्गातला मुलगा; पण आज जगभरातील अत्यंत भन्नाट ऑस्कर विनिंग मुव्हीजचं तो काम करतो आहे.
किती उदाहरणं देऊ तुम्हाला?
सॉफ्ट स्किल्समध्ये स्वतर्‍ची ओळख, तुम्हाला नेमकं काय आवडतं आणि जमतं हे तुम्हाला नीट समजणं आणि ते मांडता येणं हे क्रिटिकल आहे.
मात्र त्यासाठी वेळ द्यायला हवा. ऑनलाइन मोफत मदत करणार्‍याही अनेक टेस्ट आहे. त्या घेऊन पहा. तुम्ही टुल कुठलंही वापरा; पण ‘स्व’ची ओळख होणं हे सॉफ्ट स्किलमधलं अपरिहार्य शास्र आहे. आणि यशाचं शस्रसुद्धा!

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)

Web Title: Opportunity chance - the simplest formula for your strength!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.