नशिला वन वे

By admin | Published: November 17, 2016 05:20 PM2016-11-17T17:20:27+5:302016-11-17T17:20:27+5:30

या मार्गानं गेला तर जगताना मरणयातना आणि उद्ध्वस्त आयुष्य यापलीकडे हाती काही येत नाही. तरीही ड्रग्जच्या आहारी जात व्यसनांच्या गर्तेत का लोटतात तरुण मुलं स्वत:ला?

Nashville One Way | नशिला वन वे

नशिला वन वे

Next

आहे ना तुझ्यात हिंमत, मग कर डेअरिंग,
सिद्ध कर ना की, तू काय पपलू नाहीस..
असे डायलॉग मारत एकमेकांना भरीस पाडणारे 
आणि हातात पेटती सिगारेट देणारे खरं तर दोस्त कसे असतील? 
म्हणजे आपण त्यांना दोस्त कसे म्हणू शकतो?
पण ते असतात.. 
आणि ‘असल्याच’ दोस्तांच्या प्रभावामुळे,
संगतीमुळे आणि त्यांनी दिलेल्या डेअरिंगवाल्या चॅलेंजमुळे 
अनेकजण अमली पदार्थांच्या व्यसनांच्या नादी लागतात..
या व्यसनांना ‘वन वे’ म्हणतात.
असा वन वे, जिकडून जगण्याच्या दिशेनं परतीचा मार्ग फार कमी लोकांना सापडतो,
आणि बाकीचे काही मात्र आयुष्य उद्ध्वस्त करून घेत
या न परतण्याच्या वाटेनं कायमचे पुढे निघून गेलेले असतात..
मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरात हा अमली पदार्थांचा विळखा तरुण मुलांना ग्रासत आहे..
त्यांच्यावर उपाययोजना म्हणून पोलीस पथकं जनजागृती करत आहेत, हेल्पलाइन, इन्फोलाइनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तरीही आपल्या जगण्याचा स्टेटस सिम्बॉल असल्यासारखे अनेक तरुण व्यसनांच्या गर्तेत स्वत:ला लोटून देत आहेत..
एक दिलासा वाटावा अशी गोष्ट म्हणजे पाचशे-हजाराच्या नोटांवर सरकारनं घातलेल्या अलीकडच्या बंदीनं या ड्रग्ज तस्करीच्या व्यवहाराला थोडा आळा बसेल असा पोलिसांचा होरा आहे. कारण अमली पदार्थांचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीनेच केला जातो. यात पाचशे आणि हजार रुपयांच्या मोठ्या नोटांचा वापर होत होता. या नोटाच चलनातून रद्द केल्यामुळे तस्करीचा वेग कमी झाल्याचं अमली पदार्थविरोधी पथकाचं म्हणणं आहे. 
त्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत ड्रग्ज घेण्याचं प्रमाणही कमी होताना दिसेल असा या पथकाचा अंदाच आहे. मात्र त्यापायी तळमळणाऱ्या व्यसनी तरुणांचं आयुष्यही अधिक भयाण होईल हेदेखील खरं आहे..
ज्या वाटेवर अशा भयंकर नरकयातना आहेत, त्या वाटेवर मुळातच न जाता, स्वत:ला व्यसनांपासून दूर ठेवणं हेच तरुणांच्या हातात आहे. आणि दोस्तांच्या मर्दानगीच्या बोगस कल्पनांना झिडकारत खऱ्या अर्थानं सुंदर-स्वस्थ आयुष्य जगण्याचे मार्ग शोधणं हेच शहाणपण आहे..
त्या साऱ्याची एक विशेष चर्चा.. 
स्टेटसच्या अमली सिम्बॉलचे बळी

Web Title: Nashville One Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.