थेट लोटांगण घालत, रायगडावर!

By admin | Published: June 28, 2016 12:54 PM2016-06-28T12:54:59+5:302016-06-28T12:54:59+5:30

गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेल्या ‘किल्ले रायगडची’ चढाई भल्याभल्या टे्रकर्सना घाम फोडायला लावते.

Loom in the front, Raigadawar! | थेट लोटांगण घालत, रायगडावर!

थेट लोटांगण घालत, रायगडावर!

Next


गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेल्या ‘किल्ले रायगडची’ चढाई भल्याभल्या टे्रकर्सना घाम फोडायला लावते. रायगडची चढाई तशी कठीणच. बहुतेकजण पहिल्यांदाच रायगड पायी सर केल्यानंतर, दुसऱ्यावेळी रोप वे चा आधार घेतात, इतकी दमछाक आजही स्वराज्याच्या या राजधानीवर जाताना होते. मात्र नुकताच तिथिनुसार झालेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी अनेक शिवभक्तांना कोल्हापूरच्या एका तरुण मावळ्यामुळे रायगड न दमता चढण्याची प्रेरणा मिळाली. या पठ्ठ्याने चालत नाही, धावत तर मुळीच नाही तर चक्क जमिनीवर लोटांगण घालून दंडवत करत, पायथ्यापासून थेट राजदरबारापर्यंत महाराजांना मानाचा मुजरा केला.
किरण गुरव असे या त्याचे नाव. नुकताच १७ व १८ जून रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी रायगडावर उपस्थिती दर्शवली. गड चढाई करताना अनेक तरुण तरुणी प्रत्येकी १०-१२ पावलांनी एका बाजूला बसून पाणी किंवा सरबत पिऊन विश्रांती घेताना पाहायला मिळत होते. मात्र अचानकपणे महाराजांप्रमाणे केशरचना आणि दाढी असलेला तरुण हातात काठी घेत लोटांगण घालताना दिसला आणि सारेच अवाक् झाले. 
प्रत्येक दोन पावलांनी किरण लोटांगण घालून हळूहळू पुढे सरकत होता. तेही पाणी न पीता. माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड गावातील समाधीस्थळापासून दंडवत घालत रायगडाकडे मध्यरात्री साडेतीन वाजता कूच केल्यानंतर तब्बल साडेआठ तासांनी दुपारी बाराच्या सुमारास किरणने राजदरबारात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांनी महाराजांचा जयजयकार केला. 
यानंतर राजदरबारातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकजण केवळ किरणला भेटण्यासाठी चढाओढ करीत होता. त्याचासह फोटो आणि सेल्फी काढून घेण्यासाठी अनेकजण धडपडत होते. 
कोल्हापूरचा असलेल्या किरण फुलांचा व्यवसाय करतो. विशेष म्हणजे त्याने दुसऱ्यांदा दंडवत घालत रायगड सर केला आहे. आपल्या घरी देखील शिवभक्तीचेच वातावरण असल्याचे सांगताना किरण सांगतो की, त्याचा चार वर्षांचा मुलगा देखील महाराजांच्या प्रमुख गोष्टी अभिमानाने सांगतो.
किरणच्या गावातील पंचायत समितीसमोरील असलेल्या शिवमुर्तीकडे झालेले दुर्लक्ष त्याला अत्यंत वेदना देतात. त्यासाठी नित्यनेमाने रोज पहाटे ५ वाजता किरण स्वत: तेथे महाराजांची पुजा करतो. महाराजांसारखीच केशरचना आणि दाढी केलेला किरण महाराजांची भूमिका वठवण्यात पारंगत आहे. गणेशोत्सव आणि शिवजयंतीला विविध कार्यक्रमामध्ये त्याला मोठी मागणी असते आणि त्यामाध्यमातून किरण महाराष्ट्रभर फिरला देखील आहे. मात्र यासाठी आजपर्यंत आपण एकही रुपया स्वीकारला नसून तशी आपल्याला अपेक्षाही नसल्याचे किरण अभिमानाने सांगतो.
तरुणांनो व्यसनापासून दूर रहा..
आज अनेकजण महाराजांचे छायाचित्र असलेले टीशर्ट परिधान केलेले, गळ्यात माळ घातलेले किंवा महाराजांसारखी दाढी ठेवलेले अनेक तरुण दिसतात. या सर्वांना एक कळकळीची विनंती करताना किरण म्हणतो की, ‘‘तरुणांनी तुम्ही व्यसन आणि इतर गैरकृत्यांपासून दूर रहा. त्यामुळे इतर समाजसेवा नाही, पण कमीत कमी व्यसनमुक्त तरुणांची फळी तुम्ही तयार करा.’’
यासाऱ्या प्रवासात किरणला गतवर्षापासून त्याचा भाचा अक्षय गुरवची पुरेपुर साथ मिळत आहे. 

- रोहित नाईक

Web Title: Loom in the front, Raigadawar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.