late for office? Tesla may fire you! | ऑफिसला लेट जाता, मग तुमची नोकरी जाणार!
ऑफिसला लेट जाता, मग तुमची नोकरी जाणार!

ठळक मुद्दे10 दिवसांचं ‘टाइमली’ व्रत ही एक सवय सोडा, आयुष्य बदलून जाईल!

गेल्याच आठवडय़ातल्या या बातमीची जगभरातल्या कार्पोरेट विश्वात मोठी चर्चा झाली. टेस्ला या सध्याच्या सगळ्यात बडय़ा, हॉट, श्रीमंत कंपनीविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल. तिचा संस्थापक अ‍ॅलन मस्क सध्या कंपनीपासून दुरावलाय, पण नवीन बॉस रिचर्ड ब्रॅन्सन मोठा कठीण माणूस आहे. त्यानं अलीकडेच एका मुलाखतीत सांगून टाकलं की, माझ्या कंपनीचं नवीन धोरण आहे जो कुणी उशिरा येईल, वेळ पाळणार नाही त्याला माझ्या कंपनीत जागा नाही. त्याला सरळ नारळ देण्यात येईल. सरळ फायर करण्यात येईल.
रिचर्ड ब्रॅन्सन त्याच्या मुलाखतीत सांगतो, वेळ पाळणं हे किती सोपं काम आहे; पण लोक नेहमी उशीरा येतात. मी कुठं किती वाजता पोहोचायचं यावर माझा कण्ट्रोल असला पाहिजे, तेच जमत नसेल तर तुम्ही काय दुसरं काम करणार? मुळात जो माणूस पुंअल नाही, जो वेळ पाळू शकत नाही, तो त्याच्या कामाविषयी सिरिअस नाही आणि त्याला इतरांच्या वेळेचंही काही वाटत नाही, वेळेची किंमत नाही असं मला वाटतं. त्यामुळे अशा माणसाच्या कामावरच नाही तर एकूण कंपनीच्या कामावरच त्याचा मोठा परिणाम होतो, त्यापेक्षा त्या माणसाला कामावरून काढून टाकलेलं बरं.!’
केवळ वेळ पाळत नाही म्हणून कामावरून काढून टाकलं, हे तसं पचायला कठीणच आहे. मात्र न्यू यॉर्क या भयंकर ट्राफिक असलेल्या शहरातही ब्रॅन्सन स्वतर्‍ कधी कुठेच उशिरा पोहोचत नाही, त्यामुळे नेहमीची कारणं त्याच्यापुढे चालत नाही. हे कमीच म्हणून त्यानं अलीकडे कंपनीची पॉलिसीच बदलून टाकली.
काय बदललं?
त्यानं ठरवलं की, आता कंपनी पॉलिसीप्रमाणं येण्याजाण्याच्या वेळेचं साप्ताहिक ऑडिट होईल. कोण कितीदा उशिरा आलं, कोण लवकर गेलं याचा हिशेब थेट यंत्रणाच ठेवेल. आणि एक मिनिट उशिरा येणं किंवा लवकर जाणं हे वारंवार घडलं तर थेट नोकरीवरून हकालपट्टी. एकच मिनिट उशीर झाला वगैरे बोलायला काही जागाच नाही. टेस्लानं अलीकडे काढलेल्या
 40 टक्के मॅनेजरला पुंअल नाही असं रेकॉर्ड दाखवून काढल्याचंही नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.
तर नमनाला एवढा घडाभर तेल वाहिलं तर त्याचं मर्म एकच.
वेळ पाळणं आपण शिकलं पाहिजे.
आणि ते शिकलं नाही तर नवीन काळात आपल्याला नोकरी मिळणं तर सोडाच टिकणंही अवघड होईल!
त्यामुळे या नवरात्रात निदान नऊ दिवस तरी आपण हे व्रत करून पाहू.
दसरा होईर्पयत तरी रोज नियमित, ठरल्या वेळेत आपल्या कॉलेजला, ऑफिसला जाऊ!
वेळ पाळू!
वेळेच्या पुढे ना सही, टाइम के साथ तो चल ही सकते है.
ते नाही जमलं, तर काळ आपल्यापुढे निघून गेलेला असेल!
वेळ आहे, तोवर करून पाहू.!


Web Title: late for office? Tesla may fire you!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.