मोबाइलमधला डेटा उडाला? रिकव्हर करायचे हे घ्या काही उपाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 05:16 PM2019-03-16T17:16:03+5:302019-03-16T17:17:07+5:30

मोबाइलमध्ये आपण काय काय भरुन ठेवतो, पण ती माहिती चुकून डीलीट झाली तर शोधणार कशी? हे घ्या काही उपाय.

how to recover deleted mobile data? | मोबाइलमधला डेटा उडाला? रिकव्हर करायचे हे घ्या काही उपाय !

मोबाइलमधला डेटा उडाला? रिकव्हर करायचे हे घ्या काही उपाय !

googlenewsNext
ठळक मुद्दे डेटाची सुरक्षितता आणि जपणूक या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.

- प्रा. योगेश हांडगे

स्मार्टफोनची मेमरी वाढविण्यासाठी आपण बरेचदा फोनमधील अनेक फाईल्स डीलीट करतो. फोटो किंवा अ‍ॅप काढून टाकतो. मात्र ते करताना  एखादी महत्वाची  फाईल अथवा महत्वाचा  डेटा ही चुकून डिलीट होतो. एकदा डेटा उडाला की आपल्याला हळहळ वाटते. ते सारं पुन्हा कसं रिकव्हर करायचं हे कळत नाही. मात्र काही गोष्टी शिकून घेतल्या आणि आपल्या फोनप्रमाणेच आपणही स्मार्ट झालो तर आपल्या अँड्रॉइड फोनवरून डिलीट झालेला डेटा आपण परत मिळवू शकतो.
त्यासाठी हे काही उपाय.

डाटा रिकव्हर करण्यासाठी...


* अँड्रॉइड फोनवरून डिलीट झालेला डेटा परत  मिळविण्याकरता  प्रथम आपण आपल्या संगणकावर इजी यूज मोबी सेवर किंवा अ‍ॅँड्राइड डाटा रिकवरी अ‍ॅप यासारखे काही अ‍ॅप्स इंस्टॉल करुन घ्यावे. चाचणीसाठी हे अ‍ॅप्स विनामूल्य  उपलब्ध आहेत. अँड्रॉइड फोनवरील  डेटा पुन्हा प्राप्त करण्याकरता  आपल्याला फोनवर हे अ‍ॅप टाकावे लागतील 
* संगणकात डेटा डाटा रिकवरी अ‍ॅप इंस्टॉल करा. त्यानंतर युएसबी केबल वापरून  स्मार्टफोन संगणकाला कनेक्ट करून घ्या. मात्र ते करताना आपल्याला त्या अ‍ॅपला आपल्या  स्मार्टफोनचा फुल एक्सेस द्यावा लागेल.
* त्यानंतर स्मार्टफोनच्या सेटिंग्जवर जाऊन अबाउट फोन सिलेक्ट करा . येथे तुम्हाला बिल्ड नंबर ऑप्शन उपलब्ध असेल .जोपर्यंत ‘डेवलपर्स ऑन’ ऑप्शन आपल्याला दिसत नाही तोपर्यंत बिल्ड नंबर ऑप्शन या पर्यायावर क्लिक करा .
* नंतर सेटिंगमध्ये डेवलपर्स  ऑप्शनवर  जाऊन फोनमधील अ‍ॅप डीबगिंग सक्षम करा
* मोबाईलशी   कनेक्ट झाल्यावर  आपल्याला अ‍ॅक्सेस संदर्भात काही  मेसेज  दाखवेल , या मेसेजवर  ओके टिक करा 
* आता आपला मोबाईल अ‍ॅपशी जोडल्याबरोबरच कोण कोणते डॉक्यूमेंट आपल्याला रिकव्हर करून  पाहिजे यासंबंधित आपल्याला विचारणा होईल  जे  डॉक्यूमेंट रिकव्हर करुन हवेत ते सिलेक्ट करा , हे  सिलेक्शन   झाल्यावर  अ‍ॅप्लीकेशनचे काम सुरु  होईल 
* ते सुरु झालं  म्हणजे आपल्या स्मार्टफोनची रिकवरी प्रक्रि या   सुरू झाली आहे असं समजा. या प्रक्रि येस एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. ही प्रक्रि या जो पर्यंत सुरु  आहे तोपर्यंत आपला स्मार्टफोन संगणकाशी कनेक्ट ठेवा. चुकून डिस्कनेक्ट झाल्यास, रिकव्हरी प्रक्रि या  थांबेल.
* महत्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवा की हे एप्लीकेशन   आपल्या स्मार्टफोनमधील सर्व डेटा रिकव्हर  होईल  याची गॅरंटी देत नाही परंतु तरीही त्यातल्या त्यात हे अ‍ॅप बरंच चांगलं काम करतं.


मेमरी कार्डवरचा डेटा कसा रिकव्हर करणार?


* मेमरी कार्ड मध्ये  आपले फोटो, व्हिडीओ आणि इतर मौल्यवान माहिती आहे त्यामुळे ते फार महत्वाचं असंत. 
* परंतु चांगल्या पद्धतीने/काळजीने  ते वापरले नाही तर ते   खराब होऊ शकते आणि  त्यामुले त्यातील  आपले फोटो, व्हीडिओ नष्ट होण्याचा  धोका असतो .
* त्यात काही खराबी  असेल तर  कार्ड कधीही फॉरमॅट करू नका. थोडे करून प्रयत्न करून फोटो आणि व्हिडीओ त्यातून काढले पाहिजे.
*काहीवेळा  कार्ड रीडरमध्ये  प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यामुळे कार्ड कार्ड रीडरवर कार्ड चालू नसल्यास इतर कार्ड रीडरवर ठेवून तपासून घ्यावे .
* काही  कार्ड रीडर मायक्र ो एसडी आणि स्टैंडर्ड एसडी कार्ड दोन्ही वाचू शकतात.
* मेमरी कार्डसाठी फ्री डेटा रिकवरी अ‍ॅप असतात. डिस्क डिगर, ज़ार आणि  ईज़अस फ्री डेटा रिकवरी अ‍ॅप अ‍ॅप्स डाउनलोड करू शकता. परंतु हे  अ‍ॅप सर्व फाईल्स रिकव्हर होतील याची खातरी देत नाही.
बरेचदा रिकव्हर करताना फाइलचं नाव बदलतं किंवा फाइल करप्ट होते .
* फ्री डेटा रिकवरी अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर   सर्व फायली रिकव्हर करत नाहीत त्यावेळी विकतचे अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअरचा पर्याय आपल्याकडे  असतो. 
* हे सारं करण्यापेक्षा वेळेत आपल्या डेटाची काळजी घेणं आपण शिकलं पाहिजे.

Web Title: how to recover deleted mobile data?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.