तहानल्या गावाला ‘तरुणांच्या’ हृदयाचा ओलावा..

By admin | Published: April 26, 2017 04:23 PM2017-04-26T16:23:20+5:302017-04-26T16:23:20+5:30

- कोरडंठाक्क गाव, पण विद्यार्थ्यांनी केलं, ते तहानमुक्त..

The heart of the young 'thirsty' young people .. | तहानल्या गावाला ‘तरुणांच्या’ हृदयाचा ओलावा..

तहानल्या गावाला ‘तरुणांच्या’ हृदयाचा ओलावा..

Next

 - प्रतिनिधी

 
एखादी गोष्ट करायची असली की कोणत्याही अडचणी आल्या तरी ती करता येतेच. त्यातही ती गोष्ट आपल्या गावासाठी, समाजासाठी असेल तर त्याचं महत्त्व अधिकच. एकत्रित प्रय}ांतून काय घडू शकतं याचं प्रत्यंतर शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी नुकतंच दाखवलं आणि आणि आपल्या गावाप्रति असलेला खारीचा वाटाही उचलला. या मित्रांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून निधीही गोळा केला आणि  त्यामुळे शेकडो लोकांचा पाण्याचा प्रo्न सुटला. 
 
नाशिकपासून 35 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकरोडवर माळेगाव एका टेकडीवर वसलेले दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात शासनाच्या वतीने काही पाणीयोजना राबवण्याचा प्रयत्न झाला; पण अनेक कारणांनी या योजना अयशस्वी झाल्या. त्यामुळे गावातील महिलांना दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीतून डोक्यावरून पाणी आणणे हा रोजचे अतिशय कष्टप्रद काम करावे लागत होते.
 
सोशल नेटवर्किंग फोरम ही  संस्था आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांना पाणी, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित  जीवनावश्यक सुविधा प्राप्त करून देण्याचे काम करते.
 
गेल्या डिसेंबर महिन्यात या संस्थेच्या संपर्कात माळेगाचे रहिवासी आले आणि गावाचा पाणीप्रश्न हाती घेण्यात आला. मार्च महिन्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. 
मार्च महिन्यात सुरू झालेली ही योजना मागील काही दिवसांपूर्वी यशस्वीपणे कार्यान्वित झाली आणि गावातीलच ज्येष्ठ महिला जिजाबाई निवृत्ती मगर आणि जया वसंत कौले यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले.
 
 
शाळेचे माजी विद्यार्थी आणि जळगाव महापालिका आयुक्त जीवन सोनवणे आणि भोपाळ येथील डॉ. टी. चंद्रकांत यांनी व्हॉट्सअँपवर माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सढळ हाताने निधी दिला आणि गावाचा पाण्याचा प्रo्न सुटला.  
 
 
सोशल मीडियाद्वारे उभारला निधी
 
माळेगाव येथील पाणीपुरवठा योजनेसाठी काही निधी सोशल मीडियावर आवाहन करून उभारला गेला. या कामात अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, डॉ. उत्तम फरताळे, रामदास शिंदे यांच्या फेसबुक आणि व्हॉट्सअँपवरील आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील अनेक सोशल नेटवर्कर्सनीही निधीस हातभार लावला.
 
योजनेची तांत्रिक बाजू प्रशांत बच्छाव आणि व्यवस्थापक सचिन शेळके यांनी सांभाळली. गावातील कामाचे नियोजन सरपंच तानाजी दिवे, उपसरपंच बाळू गोर्‍हे, ग्रामसेवक मनोहर गांगुर्डे यांनी पाहिले. संपूर्ण कामात गावातील त्र्यंबक दिवे, आनंदा कसवे, हरिश्चंद्र तोटे, पांडुरंग दिवे यांनी विशेष योगदान दिले.
 

Web Title: The heart of the young 'thirsty' young people ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.