GF/BF ऑन रेण्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 07:00 AM2018-09-13T07:00:00+5:302018-09-13T07:00:00+5:30

फेसबुकनंही डेटिंग फीचरची सेवा आणण्याचं ठरवलंय. ऑनलाइन डेटिंगसाठी याआधी टिंडर हे अ‍ॅप उपलब्ध होतं. आता फेसबुक डेटिंग फीचर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. का?

GF / BF On Rent? | GF/BF ऑन रेण्ट?

GF/BF ऑन रेण्ट?

Next
ठळक मुद्देबडय़ा शहरांत डेटिंग फीचरचा मोठा ट्रॅप लागलाय आणि त्यात अनेक तरुण-तरुणी फसत आहेत.

-प्रज्ञा केळकर-सिंग

लाइफ जाम बोअरिंग झालीये यार..मजा नाही, मस्ती नाही. सिर्फकाम और काम.’
‘का रे? कॉर्पोरेट कंपनीत काम करतोस, बक्कळ पैसा कमावतोस. घरची जबाबदारी नाही. मग बोअर का होतंय?’
‘बास का? नोकरी है, पर छोकरी नही है ना. नुसता पैसा असून काय उपयोग? एन्जॉयमेंट हवी की नाही काही. दिवसभर नुसती कामाची कटकट. गर्लफ्रेंड करायची म्हटली की कमिटमेंट अँड ऑल. काहीच कळेना. ’
‘एक आयडिया सूचवू का? डेटिंग साइटशी कॉन्टॅक्ट कर. गर्लफ्रेंड ऑन रेंट. खाओ, पिओ, ऐश करो.’
‘खरंच? असं करता येईल.’
‘हो. मला मेसेज आलाय बघ. हॅलो, वाँट टू चॅट विथ मी, प्लीज कॉल फॉर डेटिंग, मीटिंग. या मेसेजमध्ये नंबरही दिला आहे. कर फोन.’
‘भारीच रे. बोअरिंग आयुष्यात काहीतरी हॅपनिंग होईल!’
***
दोन मित्रांमधला हा संवाद. 
हा संवाद काल्पनिक वाटत असेल तर वास्तव याहून भीषण आणि विचार करायला लावणारं आहे. आयुष्य घडय़ाळाशी स्पर्धा करतंय आणि आपणही यंत्रासारखं धावतो आहोत. चांगल्या पगाराची नोकरी आहे, मनासारखी जीवनशैली आहे, पण एकटेपणा आ वासून उभाय. तरु णाईचा हाच एकटेपणा, कामातला ताणतणाव, त्यातून बाहेर पडण्याची धडपड आणि  एन्जॉयमेंटची गरज लक्षात घेऊन अनेक डेटिंग साइटनी मोठय़ा शहरांमध्ये आपलं जाळं पसरवलंय! 
‘पैसा फेको, तमाशा देखो’ हे सूत्र धरून तात्पुरती मैत्रीण, फिरणं, गप्पा, हॉटेलिंग आणि सेक्स असं सगळं पुरवलं जातंय! हातात भरपूर पैसा खेळत असल्याने तरुण-तरु णी एकटेपणावरचा जालीम उपाय म्हणून या डेटिंग साइटकडे वेगानं आकर्षित होत आहेत.
    पूर्वीच्या तुलनेत आयुष्याची सगळी गणितं बदलली. जगानं आपला वेग वाढवला आणि आपली आयुष्यही त्याच वेगाने धावू लागली. शिक्षण, नोकरी, करिअर यांना कमालीचं महत्त्व आलं आहे. करिअरसाठी अनेक तरु ण-तरु णी बाहेरगावी स्थायिक होतात. नामांकित कंपनीमध्ये नोकरी असल्यानं सुखासीन आयुष्य जगायला मिळतं. पण, घरापासून दूर राहताना येणारं नैराश्य हा मोठा प्रॉब्लेम बनतो आहे. नोकरीचे काही तास सोडले की इतर वेळी काय करायचं, कोणाशी बोलायचं असं कोडं समोर ठाकतं. ऑफिसमधले मित्र-मैत्रिणी तात्पुरते असतात. टीव्ही, मोबाइलवरचं व्हच्यरुअल जग आपला एकटेपणा नाहीच घालवू शकत. आपलं म्हणून वैयक्तिक आयुष्य जगताना मानसिक आणि  शारीरिक गरजा कशा पूर्ण करणार? अशी घालमेल सुरू असतानाच एखादा मेसेज अपग्यात आपल्या फोनवर येतो.
तो म्हणतो, ‘‘हॅलो, वाँट टू चॅट विथ मी, प्लीज कॉल फॉर डेटिंग, मीटिंग’. उत्सुकतेने फोन केला की ‘हाय प्रोफाइल’ डेटिंगच्या नावाखाली विविध पॅकेजेसचा भडीमार, पैसे ऑनलाइन भरण्याची सोय, तुम्ही पैसे भरलेत की पाच मुलींचे फोटो तुम्हाला पाठवले जातील, असं सांगितलं जातं. एकटेपणा दूर करण्याच्या नादात अनेक तरु ण-तरुणी अशा आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणार्‍या एजन्सीचे बळी ठरत आहेत. यातूनच शहरांमध्ये ऑनलाइन फसवणूक करणारं सेक्स रॅकेटचं जाळं विणलं जातंय.  
    फोनवरून त्यांना डेटिंग, मीटिंग, फिजिकल रिलेशनशिप याबाबतच्या मेंबरशिपची माहिती दिली जाते. एजन्सीच्या विविध पॅकेजना भुलणार्‍या तरु णांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना यातून पुढे आल्या आहेत. ऑनलाइन पैसे भरायला सांगितल्यानंतर एजन्सीकडून आणखी काही पैशांची मागणी केली जाते. दोन-तीनदा पैसे भरून झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यास तरुणांची याबाबत विचारणा केली असता, संबंधित मोबाइल क्रमांक बंद करून टाकला जातो. अशा घटनांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलीस सातत्यानं करत आहेत.
    समुपदेशकांच्या म्हणण्यानुसार, आयुष्यातील ताणतणाव आणि त्यातून येणारे नैराश्य, एकटेपणा ही सध्याची कळीची समस्या आहे. तरुणाईला वेगवान आयुष्य जगण्याची सवय लागली आहे. एन्जॉयमेंटच्या व्याख्या आणि समीकरणं बदलली आहेत. त्यातून तरुण अशा फसवणुकीचे बळी ठरत आहेत. नैराश्याला वाट करून देण्यासाठी असे पर्याय निवडले जातात; मात्र त्यातून डोकेदुखी आणखीनच वाढते. घरापासून दूर राहत असलो तरी संवादाचे पूल निकामी होता कामा नयेत, असं समुपदेशकांचं म्हणणं आहे. मनमोकळा संवाद हे आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवरचं निराकरण होऊ शकतं. आवडीचं नाटक, सिनेमे पाहणं, आवडीचे छंद जोपासणं, पर्यटनस्थळांना भेटी देणं, आवडीच्या कलेमध्ये रममाण होणं यातून नैराश्य दूर होऊ शकतं. त्यासाठी मनाची सकारात्मकता आणि उभारी मात्र सर्वात महत्त्वाची!

***
 

डेटिंग अ‍ॅपचा चक्रव्यूह

    मूळ समस्या आहे एकटेपणाची आणि त्यावर उपाय तो डेटिंगचाच असं मानणार्‍यांची. त्यासाठी डेटिंग साइट्सबरोबरच डेटिंग फीचर्सचाही उपयोग केला जात आहे. फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार जवळपास 2 अब्ज लोक हे एकटे आहेत. त्यांच्यासाठी फेसबुकनंही डेटिंग फीचरची सेवा आणण्याचं ठरवलंय. ऑनलाइन डेटिंगसाठी याआधी टिंडर हे अ‍ॅप उपलब्ध होतं. त्याचंच अनुकरण करत आता जगातील सर्वात मोठय़ा सोशल मीडिया साइटने डेटिंग फीचर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यूजर्सच्या फेसबुक अकाउंटहून फेसबुक डेटिंगचं अकाउंट हे वेगळं असणार आहे. फेसबुक डेटिंग यूजर्सची सगळी माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे. 
    डेटिंग फीचर्स वापरताना अनेकदा सिक्युरिटी इश्यूलाही सामोरं जावं लागतं. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्वेक्षणानुसार, ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप वापरणार्‍यांना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागू शकतं अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. जवळपास 59 टक्के स्मार्टफोन यूजर्स सध्या ऑनलाइन डेटिंगचा वापर करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न मोबाइल कंपन्यांना सतावत आहे. ‘नॉर्टन’च्या सर्वेक्षणानुसार  रोमॅँटिक थीम, लव्ह मीटर टेस्ट, गीटिंग व गेम्स आदी अ‍ॅप्सचा वापर जास्त करण्यात आला. भारतात डेटिंग बेस्ड सोशल नेटवर्किग साइट्सचा वापर वेगानं वाढत आहे. अनेकजण काही मर्यादित काळासाठी असे अ‍ॅप वापरून अनइन्स्टॉल करतात. सायबर क्रिमिनल्स याच गोष्टीचा फायदा घेतात आणि यूजर्सचा इंटरेस्ट पाहून ऑफर देतात.


 

Web Title: GF / BF On Rent?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.