दोस्ती है, उसे रिश्ते का इल्जाम न दो…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:30 PM2017-08-05T15:30:48+5:302017-08-05T15:32:30+5:30

जी सच्चेपणाची अपेक्षा आपण ठेवतो इतरांकडून तसे ‘सच्चे’ दोस्त आपण स्वत: होऊ. आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात असतील अंधार्या रात्री, तर ओंजळभर प्रकाश घेऊन जाऊ मदतीला.

friendship is beyond of all relations | दोस्ती है, उसे रिश्ते का इल्जाम न दो…

दोस्ती है, उसे रिश्ते का इल्जाम न दो…

Next
ठळक मुद्देत्यांनी ‘सॉरी’ म्हणण्याची वाट न पाहता आपणच निभावून दाखवू सच्ची दोस्ती.

- ऑक्सीजन टीम

 

दोस्ती जिंदगी में रोशनी कर देती है. हर खुशी को दोगुनी कर देती है. कभी झूम के बरसती है बंजर दिल पे कभी अमावस को चांदणी कर देती है.

- दोस्तीची महती सांगणारा असाच एखादा एसएमएस एव्हाना आलाही असेल तुमच्या मोबाईलवर. जे नातं आपण निवडलं, आपल्याही नकळत जुळलं आणि जीव गेला तरी वेगळी करता येणार नाहीत मनं इतकं घट्टमुट्टही झालं. त्या ‘नात्या’ला ना रिश्तोंका इल्जाम हवा असतो ना कसली अधिकाराची, हक्कांची गरज. त्या नात्याला कळते एकच भाषा. ज्याला ‘मैत्र’ म्हणतात. मैत्र म्हणजे काहीही अपेक्षा न ठेवता देत राहणं. देताना देण्याची भावनाही संपून जावी इतकं नितळ मनानं देणं. त्या ‘देण्या’तून जी बहरते ती खरी मैत्री.! आपल्या अवतीभोवतीचं स्वार्थी, आप्पलपोटी, फक्त स्वत:चा विचार करणारं आणि स्पर्धेत मैत्रीचं ढोंग करणारं जे वातावरण आहे, त्या वातावरणात मिळतात असे सच्चे मित्रमैत्रिणी.?

मिळतात.! आणि काही तसे सच्चे आहेत, वाटता वाटता देतातही दगा.

पण म्हणून काय झालं.? जी सच्चेपणाची अपेक्षा आपण ठेवतो इतरांकडून तसे ‘सच्चे’ दोस्त आपण स्वतर्‍ होऊ. आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात असतील अंधार्‍या रात्री, तर ओंजळभर प्रकार घेऊन जाऊ मदतीला. आलाच असेल कधी त्यांच्याविषयी राग. वाटलीच असेल असूया. आणि दुखावलंच असेल त्यांनी आपलं मन. तर विसरून जाऊ या ‘फ्रेण्डशिप डे’ला सारं.

त्यांनी ‘सॉरी’ म्हणण्याची वाट न पाहता आपणच निभावून दाखवू सच्ची दोस्ती. निस्सीम श्रद्धेनं जपलं  मैत्रीचं नातं तर ते देतं जगण्याचं बळ. आणि आयुष्याला नवा आयाम. तुमच्या आयुष्याला असा अर्थ देणारे दोस्त असतील तुमच्या आयुष्य तर जपा त्यांना. त्यांच्यासाठी स्वत:ला विसरा. आणि मग पाहा. ती दोस्ती फक्त एका दिवसाचा उत्सव न राहता जन्मभर बांधून ठेवणारा एक फ्रेण्डशिप बॅण्ड ठरेल. असा एक घट्ट धागा जो आपल्याबरोबरीनं जगण्याच्या नवनव्या कक्षा पाहील. मोठा होईल आणि त्या धागण्याची वीण गुंफत जाईल आपली सुखदुर्‍खं. दोस्ती. आपल्या सगळ्यांनाच असं भरभरून देईल आणि नितळ मनानं जगायला शिकवेल.

 

Web Title: friendship is beyond of all relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.