मुळात तुम्हाला एमबीए करायची गरजच काय?

By admin | Published: May 28, 2015 02:59 PM2015-05-28T14:59:07+5:302015-05-28T14:59:07+5:30

एमबीए ही एक अत्यंत ‘बेसिक’ डिग्री आहे. तिच्यावर करिअरचे इमले बांधले जाऊ शकत नाहीत!एमबीए करू का?

Basically you need to do an MBA? | मुळात तुम्हाला एमबीए करायची गरजच काय?

मुळात तुम्हाला एमबीए करायची गरजच काय?

Next

कुणी म्हणतं एमबीए कर, त्यातून झटपट करिअरला लिफ्ट मिळेल, कुणी म्हणतं एमबीए करू नकोस, त्याची किंमत आता बीए एवढीच! एमबीए करूनही काही उपयोग नाही?

मी नक्की करू काय? एमबीए करू की नकोच?
 
 आयआयएम-अहमदाबाद नावाच्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत जर तुम्हाला अॅडमिशन मिळत असेल, तर मी एमबीए करू का, हा प्रश्नच निकालात निघतो.
पण ज्यांना अशा बडय़ा दर्जेदार संस्थेत अॅडमिशन मिळत नाही, ज्यांची बौद्धिक कामगिरीही जेमतेम आहे, बाकी काहीच दिसत नाही म्हणून मग कुठल्याही ‘डी’ग्रेड कॉलेजात एमबीएला प्रवेश घ्यावा का? -तर नाही. तिथं एमबीए करून काहीच उपयोग नाही आणि काहीच जमलं नाही म्हणून एमबीए करावं, असं तर अजिबात नाही.
पण, त्यातल्या त्यात जी मुलं हुशार आहेत, पण आयआयएम दर्जाची नाहीत त्यांनी काय करावं?
त्यांनी एमबीए करताना किमान एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे की, त्या कॉलेजने तुम्हाला तुमच्या पोटेन्शियल एम्प्लॉयर्सना तरी भेटवलं पाहिजे. बॅँका, लाइफ इन्श्युरन्स कंपन्या, फायनान्स कंपन्या हे जग तरी तुम्हाला दिसलं पाहिजे. तसं होणार नसेल, तर तुमच्या एमबीए करण्याला काहीच अर्थ नाही.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायला हवं की, एमबीए ही एक अत्यंत बेसिक डिग्री आहे. बीए, बीकॉम, बीएस्सीसारखी एक बेसिक डिग्री. त्यामुळे आपण फार मोठं काही शिकतोय, असं समजू नका. एमबीए करण्याचे फक्त काही फायदे आहेत, असं समजा..
1) तिथं प्रवेश घेतल्यावर तुमच्यापेक्षाही ‘सुपीरिअर’ असणा:या काही हुशार मुला-मुलींशी तुमची ओळख होईल. आपण नक्की कुठं उभे आहोत, याचं थोडं भान येईल.
2) एमबीएला शिकवणा:या चांगल्या शिक्षकांशी ओळख होईल.
3) कार्पोरेट इंडियाशी थोडीबहुत ओळख होईल, त्यातले काही कॅम्पस रिक्रुटमेण्टसाठीही कदाचित ते तुमच्या कॉलेजता येतील!
त्यामुळे तुम्ही एमबीए करणारच असाल तर हे सारं लक्षात ठेवा. 
आणि एमबीएला जायचंच असेल तर तुम्हाला उत्तम मार्क तरी मिळायला हवेत. (नाहीतर तुमच्या वडिलांकडे पैसे तरी हवेत, त्या जोरावर बडय़ा कॉलेजात अॅडमिशन घेता येईल.)
 
एमबीए करायचंच असं ठरवलंय, निर्णय पक्का झालाय, पण प्रश्न एकच, चांगलं कॉलेज कसं निवडायचं, नक्की कुठं अॅडमिशन घ्यायचं, कुठल्या दिशेनं जायचंच नाही?
 
1) ‘मला एमबीए का करायचंय?’ हाच प्रश्न मुळात स्वत:ला ठाकूनठोकून विचारा. बीए, बीएस्सी, बीकॉम असं काहीतरी करायचं आणि मग ऐनवेळेस ठरवायचं की, चला आता पुढे काहीतरी करायचं तर एमबीए करू! मला तर अशाही काही मुली माहिती आहेत, ज्यांनी लग्न टाळायचं म्हणून फक्त एमबीएला अॅडमिशन घेतले. या अशा कारणांसाठी एमबीए करूच नका, त्याचा काही उपयोग नाही.
विचार करायचाच असेल तर पॉङिाटिव्हली करा.  आपल्याला त्या क्षेत्रत काहीतरी काम करायचंय, करिअर घडवायचंय हे पक्कंअसेल तरच एमबीएच्या वाटय़ाला जा!
 
2) एमबीए झाल्यावर कुठं काम करायची तुमची इच्छा आहे, हा प्रश्नही आत्यंतिक महत्त्वाचा. तुम्हाला फायनान्समध्ये अत्यंत उच्च स्तरावर काम करण्याची महत्त्वाकांक्षा असेल, तर न्यूयॉर्क, लंडन, हॉँगकॉँग, सिंगापूर, दुबई या शहरात इंटरनॅशनल करिअर आहे. आणि तिथे पोहोचायचं असेल, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या कॉलेजातून एमबीए करायला हवं. तुम्हाला भारतात बॅँकेतच नोकरी करायची असेल तर एमबीए कशाला करता, त्यासाठी बॅँकाच्या परीक्षा द्या.  
मुद्दा काय, आपल्याला कुठे आणि काय काम करायचंय हे ठरवून एमबीएसाठी कॉलेज निवडा!
 
3) एमबीएची डिग्री तुम्हाला फोकस करायला शिकवते. नुसतं फायनान्समध्ये करिअर असं म्हणून नाही चालत, तर कार्पोरेट फायनान्स, ब्रोकरेज, इन्व्हेस्टमेण्ट बॅकिंग, नक्की कशात काम करायचंय हे ठरवावं लागतं. त्याप्रमाणो कॉलेज निवडायला हवं. त्यामुळे आपल्याला करायचं काय हे ठरवून मग त्यात स्पेशलायङोशन असलेलं कॉलेज निवडा!
 
4) कुठल्याही कॉलेजात जाऊन एमबीएची डिग्री आणली असेल तर त्या डिग्रीला बाजारात काही किंमत नाही हे लक्षात ठेवा!
पी. व्ही. सुब्रमण्यम
सुप्रसिद्ध अर्थसल्लागार आणि विश्लेषक

Web Title: Basically you need to do an MBA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.