मीच का?

By admin | Published: May 26, 2016 11:26 PM2016-05-26T23:26:11+5:302016-05-26T23:26:51+5:30

जगायचं कसं? हे मला जगण्यानं नाही तर ‘मरणानं’ शिकवलं, असं म्हणत जगण्याचं एक वेगळंच चित्र

Am I | मीच का?

मीच का?

Next

 जगायचं कसं?

हे मला जगण्यानं नाही तर
‘मरणानं’ शिकवलं,
असं म्हणत जगण्याचं
एक वेगळंच चित्र 
 
 
फेसबुकच्या सीओओ 
शेर्ली सॅण्डबर्ग
 
यांनी बर्कली विद्यापीठातल्या
विद्याथ्र्याशी शेअर केलं.
त्या भाषणाचा हा संपादित अनुवाद.
जगा, असं सांगणारा.
 
 
 
आज तुमच्यासाठी एक मोठा आनंदाचा, सेलिब्रेशनचा दिवस! ग्रॅज्युएशनचा. डोक्यावरच्या टोप्या उडवत तुम्ही हा दिवस साजरा कराल, फोटो काढाल, ते शेअरही कराल. आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही गाठलाय आणि एक नव्या आयुष्याला इथून पुढं सुरुवात कराल.
तुम्हाला काही सांगावं, जगण्यानं मला जे शिकवलं ते तुमच्याशी वाटून घ्यावं म्हणून मी इथं तुमच्यासमोर उभी आहे हे खरं; पण जगण्यातून नाही, तर ‘मरणानं’ मला जे शिकवलं ते तुमच्याशी शेअर करतेय.
असं जाहीरपणो मी आजवर काही बोलले नाही; पण डोळ्यात पाणी आणि घशात आवंढा न आणता ‘बर्कले’ विद्यापीठातल्या जगप्रसिद्ध कॅम्पसमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.
एक वर्ष आणि 13 दिवसांपूर्वीची ही गोष्ट. माझा नवरा डेव्ह मला सोडून गेला.
मेक्सिकोत एका मित्रच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या पार्टीला आम्ही गेलो होतो. मी दुपारी एक छोटी डुलकी काढली. डेव्ह व्यायाम करायला गेला.
आणि त्यानंतर जे घडलं ते अतक्र्य होतं.
मी धावत गेले तर जीममध्ये तो निष्प्राण फरशीवर पडलेला होता. विमानानं घरी आले तर मुलांना काय सांगणार होते, की तुमचा बाबा आपल्याला सोडून गेला.
त्यानंतर किती महिने मी दु:खाच्या काळ्याकुट्ट अंधारात रडलेय, रिकाम्या निर्वात पोकळीत एकटेपणात हरवलेय, माङया जगण्यातली पोकळी माङया मनात नाही तर श्वासात भरत गेली. इतकं दडपून जात होतं सारं की श्वास घेणं अवघड व्हावं.
डेव्हच्या मृत्यूनं मला पुरतं बदलून टाकलं. आयुष्यात काहीतरी अतीव मौल्यवान गमावण्याचं दु:खं सोसत जगणं मी शिकले.
पण या सा:यात अजूनही एक गोष्ट मी शिकत गेले की, जेव्हा आयुष्य तुम्हाला गच्च दाबून टाकतं, पार गाडून टाकायचा प्रयत्न करतं तेव्हा तुम्ही अत्यंत ताकदीनं एक जोरदार प्रहार करून कोंडलेला श्वास मोकळा करत पुन्हा डोकं वर काढूच शकता!
अतीव दु:खद पोकळीच्या, अत्यंत कठोर निष्ठुर परीक्षेच्या काळातही आपण काही गोष्टी स्वत:साठी निवडू शकतो.
काय निवडायचं? - आनंद आणि जगण्याचा अर्थ, ध्येय!
मी हे सारं तुम्हाला का सांगतेय, तर कॉलेजमधून बाहेर पडून तुम्ही नव्या आयुष्याला सुरुवात कराल, तेव्हा जगण्याकडूनच तुम्ही हे सारं शिका. उमेद, ऊर्जा, आपला आतला आनंदाचा प्रकाश हे सारं जपा. जे मला मृत्यूनं शिकवलं ते तुम्ही जगण्याकडून शिका.
आयुष्यात प्रत्येकाला निराशेला सामोरं जावं लागतंच.
आपल्याला ए वस्तू हवी असते, मिळते बी. अनेकदा तर आपल्याला ए हवी असते मिळतेही ए, पण तरी आपण समाधानी नसतो. उदाहरण सांगते काही मुलं फेसबुकमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करतात. पण ती मिळते गुगलमध्ये. तरी नाराज होतात, हरलो म्हणतात.
पण या ज्या गोष्टींनी निराशा येते त्या किरकोळ म्हणाव्यात अशा. कुठल्या क्षणी आपल्यासमोर एक मोठं दिव्य उभं राहील याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादी मोठी, हातातोंडाशी आलेली संधीच निसटून जाते. नोकरी मिळते पण तिथं मन रमत नाही, मोठं आजारपण, अपघात या गोष्टींनी आयुष्य एका क्षणात बदलून जातं. काही नाती तुटतात, कायमची. आणि काही माणसं तर कायमची आपल्याला सोडून निघून जातात, परत कधीही न येण्यासाठी!
दुर्दैवानं असं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडलं तर?
काळ तुमची परीक्षा पाहील. असं आव्हान तुमच्यासमोर उभं राहील की ज्यानं तुम्ही आंतरबाह्य हादरून जाल आणि त्यावरूनच ठरेल की तुम्ही नक्की कोण आहात? त्यावेळी तुमच्या पदव्या, तुमची पदं, नोक:या, तुमचं यश हे सारं नाही सिद्ध करणार की तुम्ही कोण आहात, तर तुम्ही या संकटातून निभावून बाहेर कसे पडलात यावरून तुमच्या जगण्याचे खरे अर्थ ठरतील!
आणि म्हणून या टप्प्यावर मी जे शिकले ते मानसोपचारतज्ज्ञ मार्टीन सेलिंगमॅन यांनी जे सूत्र सांगितलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आयुष्य जगण्याचे तीन ‘पी’ आहेत ते, त्यांच्या मदतीनं आपण जगण्याच्या अत्यंत कठोर परीक्षेतूनही झगडून बाहेर पडू शकू. मनात काळ्या निगेटिव्हिटीचं बी सतत पेरण्यापेक्षा आणि तेच आठवत राहण्यापेक्षा जगण्याकडे एका नवीन दृष्टीनं पाहू.
त्यासाठीचे हे तीन पी.
तुम्हाला तुमचे आनंद, तुमचं जगणं आणि उमेद शोधायला नक्की मदत करतील.
 
 
 
3 P
हे सूत्र शिकलात तर जगण्यात उमेदीचं आणि आनंदाचं बी नक्की रुजेल!
 
 
आपण ठरवू, आपल्याला वाटतं तसंच सारं आयुष्यात घडेल, घडतं असं नाही. जे घडतं ते स्वीकारून, त्यातून बाहेर पडण्याची, स्वत:चा आनंद शोधण्याची लवचिकता आपल्या मनाला शिकवावीच लागेल. जे वाईट झालं ते कसं हे आपणाला पुन्हा पुन्हा आठवतं तसंच जे चांगलं झालं ते आठवण्याचं आणि त्यानुसार उमेद धरण्याचं बीही  आपल्याला मनात रुजवावं लागेल.
ते जमावं म्हणून आवजरून जपावेत असे हे तीन P.
 
1) पर्सनलायङोशन
हा सगळ्यात पहिला पी. काहीही वाईट घडो. काहीजण लगेच स्वत:लाच दोषी धरतात. स्वत:लाच छळतात. माझीच चूक म्हणत खूप मनस्ताप करून घेतात. जे घडतं त्याची जबाबदारी घेणं वेगळं आणि स्वत:ला दोष देणं वेगळं, या दोन अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा पहिला एक धडा कायम लक्षात ठेवा की, आपल्या अवतीभोवती जी प्रत्येक गोष्ट घडते ती ‘आपल्याचमुळे’ घडलेली नसते.
डेव्ह गेला. माझंही असंच झालं. मी स्वत:लाच दोष देत होते. तो हृदयविकारानं गेला तेव्हा मी त्याचे सारे मेडिकल रिपोर्ट्स घेऊन बसले. खूप वेळा तपासून पाहिलं की मी काय करायला हवं होतं, काय करू शकले असते. खूप दोष दिला स्वत:ला, खूप छळलं. पण तिसरा ‘पी’ मी शिकले तेव्हा माङया लक्षात आलं की त्याचा मृत्यूू मी थांबवू शकले नसते. त्याच्यावर उपचार करणा:या तज्ज्ञ डॉक्टरांना जिथं त्याच्या आजाराचं निदान झालं नाही तिथं मी तर अर्थशास्त्र शिकलेली, मला त्यातलं काय कळतं? मग मी त्याच्यासाठी काय करू शकले असते.
जे आपल्या हातातच नव्हतं, आपल्या क्षमतेच्या बाहेर होतं त्यासाठी स्वत:ला दोष देणं बंद करायला हवं. 
जे आपण करू शकतो, त्यासाठी स्वत:ला सतत प्रयत्न करायला भाग पाडणं, सतत क्षमता वाढवणं वेगळं, दोष देणं वेगळं.
 ‘मीच जबाबदार’ असं म्हणत अनेक गोष्टींचं अपयश आपण घेणं बंद करायला हवं.
 
2) पर्वसिव्हनेस
एखादी गोष्ट झाली की, आपण लगेच असं म्हणतो, संपलंच सगळं. माङया सा:या जगण्यावर आता या घटनेची सावली कायमची पडणार. त्या घटनेची व्यापकता, तिचे परिणाम जेवढे दिसतात त्यापेक्षा कैक मोठी अशी ती घटना आपल्याला दिसते. आपण आपलंच दु:ख अत्यंत मोठं करतो. खूप मोठं, इतकं की त्यात आपण हरवून जातो.
माङया आयुष्यातल्या अतीव दु:खाच्या काळात मी ज्या मानसोपचारतज्ज्ञाशी बोलत होते ते म्हणाले, पहिले एक काम कर, तुङया मुलांचं आयुष्य, त्यांचं रुटीन पुन्हा पूर्वीसारखं सुरू कर. डेव्ह गेला त्यानंतर दहा दिवसांनी ते शाळेत जायला लागले, मी पूर्वीसारखी ऑफिसला जायला लागले.
फेसबुकच्या ऑफिसमध्ये त्यानंतरच्ी पहिली मीटिंग, काहीतरी चर्चा सुरू होती. मी तिथं नव्हतेच. पण प्रयत्न करून, लक्ष देऊन पुन्हा त्या चर्चेत सहभागी झाले. विषय बदलला आणि मी क्षणभर ते मरण विसरले.
आणि मग कामात माङया लक्षात यायलं लागलं की, जे घडलंय ते अत्यंत वाईट आहे. पण सुदैवानं माझी मुलं माङयाजवळ आहेत. धडधाकट आहेत. माझी तब्येत बरी आहे. आधाराची, प्रेमाची माणसं सोबत आहेत. माङयाकडे आर्थिक समृद्धी आहे. हळूहळू माझी मुलंही रात्री झोपू लागली. रडणं कमी, खेळणं जास्त सुरू झालं.
 
 3) पर्मनन्स
काही दु:खं खरंच खूप मोठी असतात. पण काही दु:खं ही काही अंशी आणि इतकी मोठी नसतात की ज्याची वेदना आयुष्यभर राहील. आपल्याला आत्ता जे दु:ख होतंय, ते कायम तितकंच होत राहणार नाही हे मान्य करायला हवं. ते दु:ख आत्तापुरतं आहे, ते संपेल हे ओळखायला हवं.
पण आपण ते मान्य करत नाही. आपल्याला दु:ख होतं, खूप होतं. दु:ख झालं याचं दु:ख होतं, ते कमीच होत नाही याचंही होतं. आपल्या आयुष्यात सतत दु:ख आहे असंही वाटतं. त्यातून दु:ख खरंच वाढत जातं आणि आपण कामयचे दु:खी बनतो.
त्यामुळे जी घटना, जे दु:ख जेवढं आहे तेवढय़ापुरतं स्वीकारायला शिका, शिकायला हवं.
तरच सुख जगण्यात जागा करेल!
( अनुवाद - अनन्या भारद्वाज)

Web Title: Am I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.