यू मुंबा ‘पँथर्स’वर स्वार

By admin | Published: July 27, 2014 01:16 AM2014-07-27T01:16:27+5:302014-07-27T01:16:27+5:30

कबड्डीलाही ग्लॅमरस लूक मिळेल असे कुणी स्वप्नातच पाहिले असेल, परंतु चारू शर्मा यांच्या प्रयत्नांनी हे स्वप्न अखेर सत्यात उतरले.

Yu Mumba Rouse on 'Panthers' | यू मुंबा ‘पँथर्स’वर स्वार

यू मुंबा ‘पँथर्स’वर स्वार

Next
स्वदेश घाणोकर - मुंबई
कबड्डीलाही ग्लॅमरस लूक मिळेल असे कुणी स्वप्नातच पाहिले असेल, परंतु चारू शर्मा यांच्या प्रयत्नांनी हे स्वप्न अखेर सत्यात उतरले. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच दिवशी बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ, अभिषेक, जया, ऐश्वर्या हे बच्चन कुटुंब आणि  आमीर खान, शाहरूख खान, बोमन इराणी, कबीर बेदी, सुनील शेट्टी, फराह खान, सोनाली कुलकर्णी हे स्टार कबड्डीच्या पटांगणावर आज अवतरले. हे कमी होते की काय, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पत्नी अंजलीसह येथे उपस्थिती लावली. 
अशा या दिग्गजांच्या उपस्थितीत कबड्डीच्या नव्या इतिहासाचे पहिले पान लिहिले ते ‘यू मुंबा’ आणि ‘जयपूर पिंक पँथर्स’ या संघांतील लढतीने.  एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या या ग्लॅमरस तडक्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद लाभला. सामना सुरू होण्यापूर्वी जवळपास एक तास आधीपासूनच प्रेक्षकांचा ओढा स्टेडियमच्या दिशेने सरकत होता.   सामन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या खेळाडूंनी आक्रमक खेळावर भर दिला. पहिल्याच मिनिटाला कर्णधार अनुप कुमार याने चढाईत जयपूरच्या राजू लाल चौधरी याला बाद करून मुंबईला यश मिळवून दिले. अनुपने केलेला हा o्रीगणोशा मुंबईच्या खेळाडूंनी पुढेही तसाच कायम राखला.  आठव्या मिनिटाला जयपूरने 7-5 अशी आघाडी घेत कमबॅकचा प्रयत्न केला  नवनीत गौतमसारखा अनुभवी आणि भारतीय संघाचा कर्णधार असलेला खेळाडू जयपूरकडे असूनही त्यांना फार करिष्मा दाखविता आला नाही. 11व्या मिनिटाला जीवा कुमारने चढाईत नवनीतची पकड अपयशी ठरवून मुंबईला आघाडी मिळवून दिली. एका मिनिटाच्या आत मैदानावर उपस्थित असलेल्या जयपूरच्या दोन्ही खेळाडूंना बाद करून मुंबईने पहिला लोण चढवला. जयपूरचा एक-एक खेळाडू बाद होत असताना ऐश्वर्याच्या चेह:यावरील भाव बदलत होते. मध्यांतरार्पयत मुंंबईने 25-12 अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल निश्चित केला होता. 
मध्यांतरानंतर  जयपूरच्या खेळाडूंनी अनपेक्षितपणो आक्रमक खेळ केला आणि सामन्यात कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, मध्यांतरापूर्वीच्या पिछाडीमुळे त्यांना पराभव टाळणो शक्य झाले नाही. जयपूरकडून जसवीर सिंह आणि मनिंदर सिंह यांनी दमदार खेळ केला. 35व्या मिनिटाला जयपूरने पहिला लोण चढवला. हा लोण मिळाल्याने  निराश बसलेल्या ऐश्वर्याच्या चेह:यावर हास्य फुलले.  मात्र,  अनुपने 15पैकी आठ यशस्वी चढाया करून मुंबईला 45-31 असा विजय मिळवून दिला. अनुपला सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा, तर सरेंदर नदा याला संरक्षकाचा मान मिळाला.
 
प्रो कब्बडीच्या पहिल्या लढतीत  
यु- मुंबा’ने 45-31 अशा फरकाने ‘जयपूर पिंक पँथर्स’चा पराभव केला. या लढतीत मध्यांतरानंतर जयपूरच्या जसवीर सिंह याची यशस्वी पकड करताना मुंबईचे खेळाडू. मुंबईकडून  अनुप कुमारने उत्कृष्ट खेळ केला.
 
मी येथे खेळाला पाठिंबा देण्यासाठी आलो. कबड्डीला मिळत असलेला पाठिंबा पाहून मी थक्क आहे. हा अनुभव अविस्मरणीय होता.  - सचिन तेंडुलकर
 
लहानपणी हा खेळ मी खेळलेलो आहे; आणि इतक्या वर्षानी आज पुन्हा हा खेळ पाहून मला आनंद झालाय. - आमीर खान 
 
कबड्डीसाठी हे चांगले पाऊल आहे. हा असा खेळ आहे की तो प्रत्येक  जण लहानपणापासून खेळत आले आहेत. हा सामान्य खेळ वाटत असला तरी यात लागणारी बुद्धीची कसोटी, आक्रमकता आणि शारीरिक मजबुती महत्त्वाची आहे.- अमिताभ बच्चन

 

Web Title: Yu Mumba Rouse on 'Panthers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.