विंडीज-बांगलादेश सामना

By admin | Published: August 23, 2014 10:04 PM2014-08-23T22:04:08+5:302014-08-23T22:04:08+5:30

वेस्ट इंडिजचा सलग दुसरा विजय

Windies-Bangladesh match | विंडीज-बांगलादेश सामना

विंडीज-बांगलादेश सामना

Next
स्ट इंडिजचा सलग दुसरा विजय
वन-डे सामना : बांगलादेशचा ७० धावांत खुर्दा, नरेन, केमार रोच यांचे प्रत्येकी ३ बळी
सेंट जॉर्ज/ग्रेनाडा : सुनील नरेन आणि केमार रोच (प्रत्येकी ३ बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडीजने दुसर्‍या वन-डे लढतीत बांगलादेशचा १७७ धावांनी धुव्वा उडविला़ या विजयासह विंडीजने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली आहे़
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर २४८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले़ त्यानंतर बांगला संघाचा अवघ्या ७० धावांत खुर्दा पाडून सामन्यात १७७ धावांनी बाजी मारली़ या विजयासह विंडीजने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे़ विंडीजने पहिल्या लढतीत ३ विकेटस्नी सरशी साधली होती़
बांगलादेशची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही तिसरी नीचांकी धावसंख्या आहे़ या संघाने अखेरच्या सात विकेटस् अवघ्या १३ धावांत गमावल्या़ बांगलादेशकडून केवळ तमीम इकबाल (३७) यालाच दुहेरी आकडा गाठता आला़ वेस्ट इंडीजकडून सुनील नरेन याने १३ धावांत, तर केमार रोच याने १९ धावांत ३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवून संघाच्या विजयात योगदान दिले़
त्याआधी वेस्ट इंडिजने आक्रमक फलंदाज ख्रिस गेल (५८) आणि डॅरेन ब्राव्हो (५३) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर ७ बाद २४७ धावांपर्यंत मजल मारली़ या व्यतिरिक्त विंडीजकडून लेंडल सिमन्स याने ४० आणि दिनेश रामदीन याने ३४ धावांचे योगदान दिले़ बांगलादेशकडून मशरफे मोर्तजा याने ३, तर अमीन हुसैन याने २ बळी मिळवले़

Web Title: Windies-Bangladesh match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.