Wimbledon : ऑस्ट्रेलियाची अव्वल मानांकित ॲश्ले बार्टी बनली विम्बल्डन चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 07:19 AM2021-07-11T07:19:20+5:302021-07-11T07:20:04+5:30

अंतिम लढतीत कॅरोलिना प्लिस्कोव्हा पराभूत.

Wimbledon australia ashleigh barty becomes Wimbledon champion | Wimbledon : ऑस्ट्रेलियाची अव्वल मानांकित ॲश्ले बार्टी बनली विम्बल्डन चॅम्पियन

Wimbledon : ऑस्ट्रेलियाची अव्वल मानांकित ॲश्ले बार्टी बनली विम्बल्डन चॅम्पियन

Next
ठळक मुद्देअंतिम लढतीत कॅरोलिना प्लिस्कोव्हा पराभूत.

लंडन : अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाची ॲश्ले बार्टी यंदा विम्बल्डनटेनिसची नवी विजेती बनली. शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बार्टीने झेक प्रजासत्ताकाची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा ६-३,६(४)- ७ (७), ६-३ असा पराभव करीत ग्रॅन्डस्लॅम चषक उंचावला. बार्टीचेहे दुसरे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद असले तरी विम्बल्डनचे हे पहिले जेतेपद आहे. 

यापूर्वी बार्टीने २०१९ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तसेच इव्होनी कावलीनंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. ४१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने महिला एकेरीत विजय प्रस्थापित केला. बार्टी आणि प्लिस्कोव्हा या दोन्ही खेळाडू पहिल्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या.

पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करणाऱ्या बार्टीला दुसऱ्या सेटमध्ये प्लिस्कोव्हाने चांगलाच घाम फोडला शिवाय ट्रायब्रेकरमध्ये विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये बार्टीने जोरदार ‘कमबॅक’ करीत प्लिस्कोव्हाला पराभूत केले. विजयानंतर बार्टी म्हणाली,‘ मी गूलागोंगकडून प्रेरणा घेतली. १९७१ ला गूलागोंगने जसा ड्रेस घातला होता, तसाच ड्रेस आज मी घातला.’ आठवी मानांकित प्लिस्कोव्हाविरुद्ध ती सर्वच आघाड्यांवर सरस ठरली.  २९ वर्षांची प्लिस्कोव्हा दोनदा मोठ्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली पण दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

दहा वर्षांपूर्वी ज्युनिअर जेतेपद
२५ वर्षांच्या बार्टीने दहा वर्षांआधी विम्बल्डन ज्युनिअरचे जेतेपद पटकविले होते. यानंतर थकव्यामुळे २०१४ ला किमान दोन वर्षे टेनिसपासून दूर राहण्याचाही निर्णय घेतला.  याच काळात ऑस्ट्रेलियाकडून व्यावसायिक क्रिकेटमध्येही हात आजमावला. मात्र टेनिसकडे वळण्याचा मोह तिला आवरता आला नाही.

Web Title: Wimbledon australia ashleigh barty becomes Wimbledon champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.