आरसीबीच्या अंतिम ११ जणांत स्थान मिळण्याची आशा नव्हती

By Admin | Published: May 30, 2015 01:43 AM2015-05-30T01:43:26+5:302015-05-30T01:43:26+5:30

सर्वांत युवा फलंदाज सर्फराजने ख्रिस गेल, अ‍ॅबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांमुळे अंतिम ११ जणांत स्थान मिळवण्याचा विश्वास वाटत नव्हता, असे सांगितले.

There was no hope for the last 11 of RCB | आरसीबीच्या अंतिम ११ जणांत स्थान मिळण्याची आशा नव्हती

आरसीबीच्या अंतिम ११ जणांत स्थान मिळण्याची आशा नव्हती

googlenewsNext

लखनौ : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये आपल्या कामगिरीने विशेष ठसा उमटवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सर्वांत युवा फलंदाज सर्फराजने ख्रिस गेल, अ‍ॅबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांमुळे अंतिम ११ जणांत स्थान मिळवण्याचा विश्वास वाटत नव्हता, असे सांगितले. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण असणाऱ्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिल्याने आपला आत्मविश्वास उंचावल्याचेही तो म्हणाला.
उत्तर प्रदेशच्या आजमगढस्थित आपले गाव बासूपूर येथे आलेल्या सर्फराजने त्याचे आयपीएलचे पहिले पर्व खूप चांगले ठरले आणि त्यादरम्यान सर्वच सीनियर खेळाडूंनी खूप मदत केल्याचे सांगितले.
आरसीबीने ५0 लाख रुपयांत खरेदी केलेला सर्फराज म्हणाला, ‘‘सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची कोणाला लगेच संधी मिळत नाही. त्या क्रमांकावर सर्वसाधारणपणे सीनियर किंवा अनुभवी खेळाडूला संधी दिले जाते. त्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजावर जास्त दबाव असतो. या स्थानावर मला फलंदाजीची संधी मिळाल्याने मी नशीबवान आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे; परंतु माझे पाय मात्र जमिनीवरच आहे.’’
जागतिक पातळीवरील गोलंदाजांचा समावेश असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध साखळी लढतीत २१ चेंडूंत ४५ धावा फटकावताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या या फलंदाजाने म्हटले, ‘‘गेल, डिव्हिलियर्स आणि कोहली यांनी मला फलंदाजांचे अनेक कौशल्य शिकवले. येणाऱ्या काळात मी ते लक्षात ठेवून त्यावर काम करेल. त्यामुळे माझा खेळ आणखी चांगला होईल. याची मला आशा वाटते.’’
आयपीएलसारख्या मोठ्या व्यासपीठावर गेल, डिव्हिलियर्स आणि कोहलीसारखे जबरदस्त खेळाडू असतानाही आपल्यावर कोणताही दबाव नव्हता. आपले वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपला स्वत:वर विश्वास होता, असे आपल्या पहिल्या आयपीएल हंगामात चांगल्या कामगिरीच्या दबावाविषयी सर्फराजने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: There was no hope for the last 11 of RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.